कोरोना : फैजपूरात संचारबंदीचे उल्लंघन; एकावर गुन्हा

फैजपूर प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी असतांना चहाचे दुकान उघडल्याप्रकरणी फैजपूरात एकावर गुन्हा करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात कमी व्हावा यासाठी २१ दिवसांचा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज संचारबंदीचा आठवा दिवस असल्याने काल ३१ मार्च रोजी शहरातील अजहर अली सादिक अली (वय-२१) रा. इस्लामपूरा याने संचादबंदीचे उल्लंघन करत चहा टपरी उघडी ठेवल्याप्रकरणी फैजपूर पोलीसात भादवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content