धनाजी नाना चौधरी महाविद्यालयात संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार

जळगाव प्रतिनिधी । धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संस्थेतर्फे रौप्य महोत्सवानिमित्त अध्यक्ष आ.शिरीषदादा चौधरी आणि संचालक मंडळ, तापी परिसर विद्या मंडळ पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा सोमवार दि.१३ डिसेंबर रोजी दुपारी आयोजित करण्यात आला होता.

आपल्यातील उत्तम असणारे कौशल्य, ज्ञान विद्यार्थ्यांना देण्याची समर्पणाची भावना धनाजी नाना चौधरी विद्याप्रबोधिनी संस्थेच्या प्रत्येक शिक्षक, कर्मचाऱ्यांमध्ये आहे. यामुळेच संस्थेची वाटचाल प्रगतीपथावर राहिली आहे. राज्य, देशपातळीवर विद्यार्थ्यांनी गौरवास्पद कामगिरी करून नाव कमावले आहे. याचा मला संस्थाध्यक्ष म्हणून अभिमान राहील, बाळासाहेब चौधरी यांचा शैक्षणिक वारसा कायम गौरवांत ठेवावा असे भावोद्गार संस्थेचे अध्यक्ष तथा आ.शिरिष चौधरी यांनी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सत्काराप्रसंगी केले.

याप्रसंगी अध्यक्षस्थानी आ.शिरिष चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार तथा गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष उल्हास पाटील, जनता शिक्षण मंडळ सचिव  प्रा.डॉ.प्रभात चौधरी, सातपुडा विकास मंडळ, पालचे सचिव अजित पाटील, तापी परिसर विद्या मंडळाचे उप चेअरमन किशोर चौधरी, उपाध्यक्ष मिलिंद वाघुळदे, धनाजी चौधरी संस्थेचे उपाध्यक्ष सुनील पाटील, सचिव प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी, संचालक चंदन अत्तरदे, डॉ. विनय पाटील, प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील,  ग.स.सोसायटी संचालक तुकाराम बोरोले आदी उपस्थित होते.

सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. तसेच कर्मयोगी स्वातंत्र्यसैनिक धनाजी नाना चौधरी आणि लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. प्रस्ताविकामध्ये प्रा.डॉ.पी.आर.चौधरी यांनी कार्यक्रमामागील भूमिका विशद करीत संस्था कायम प्रगतीपथावर जात असल्याचे सांगून संस्थेचा इतिहास विशद केला. प्रसंगी धनाजी नाना चौधरी संस्थेचे उपाध्यक्ष सुनील पाटील, तापी परिसर   विद्या मंडळाचे सह सचिव नंदकुमार भंगाळे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वाय.जी.महाजन,  कार्यालयीन अधीक्षक धनंजय महाजन यांनी मनोगत व्यक्त करीत संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेमध्ये काम करीत असताना काय अनुभव आले, संस्थेच्या प्रगतीचा प्रवास त्यांनी कथन केला.

कार्यक्रमामध्ये संस्थेचे अध्यक्ष आ.शिरीष चौधरी हे यावल-रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्याबद्दल त्यांचा संस्थेच्या सर्व संचालकांच्या हस्ते पुष्पहार, सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन हृद्य सन्मान करण्यात आला.  तसेच तापी परिसर विद्या मंडळ, फैजपूरच्या कार्यकारिणी मंडळावर निवड झाल्याबद्दल उपाध्यक्ष मिलिंद वाघूळदे, व्हाईस चेअरमन किशोर चौधरी, सचिव प्रा.मुरलीधर फिरके, सहसचिव नंदकुमार भंगाळे, कार्यकारिणी सदस्य संजय चौधरी, प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील, प्राचार्य डॉ.आर.एल.चौधरी यांचा सत्कार झाला. यासह धनाजी नाना चौधरी संस्थेचे उपाध्यक्ष सुनील पाटील, सचिव प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, संस्थेचे संचालक प्रा.डॉ.विनय पाटील यांच्यासह संचालक चंदन अत्तरदे यांची जळगाव पीपल्स बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

डॉ.उल्हास पाटील म्हणाले की, सातपुड्यातल्या आदिवासी, दुर्गम विद्यार्थ्याला घडविण्याचे कार्य बाळासाहेब चौधरी यांच्या शैक्षणिक संस्थेला जाते. धनाजी नाना चौधरी संस्थेच्या विकासाचा आलेख वाढत जाऊन देशपातळीवर ओळख निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना आयुष्यात रोजगारासाठी सहाय्यक ठरेल असे कौशल्य विकास अभ्यासक्रम या शैक्षणिक संस्थेत आहेत. विद्यार्थ्यांच्या  जडणघडणसाठी प्राचार्य, शिक्षक प्रोत्साहन देतात, हे कौतुकास्पद आहे  असेही गौरवोद्गार डॉ.उल्हास पाटील यांनी काढले.

जळगाव शहराच्या व जिल्ह्याच्या विकासासाठी लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी  दूध संघ केंद्र, विमानतळ , आकाशवाणी केंद्र , उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विविध प्रकल्प हे आणण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका होती. या संकल्पनेतून धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षी लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या स्मारकाची मागणी जनता शिक्षण मंडळाचे सचिव प्रभात  चौधरी यांनी केली. यावेळी छबिलदास खडके, डॉ.युवराज वाणी, पोलीस पाटील काशिनाथ पाटील, रूपा खडके, माजी नगरसेवक मनोज चौधरी, डॉ.राहुल चौधरी, कल्पना अत्तरदे, भालचंद्र चौधरी, ललित चौधरी, लेवा सम्राज्ञी फाउंडेशनच्या संचालिका सुनिता चौधरी, सीमा गाजरे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.डॉ.कल्पना भारंबे यांनी तर आभार प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघूळदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय आणि शिरिष मधुकरराव चौधरी विज्ञान  वाणिज्य आणि कला महाविद्यालय जळगाव येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content