बंद घर फोडून ७० हजारांचा ऐवज लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील ओमशांत नगरात बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ७० हजार रूपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी ३० डिसेंबर रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, विजय रामदास तायडे रा. ओमशांती नगर जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी २५ डिसेंबर रोजी ते घराला कुलूप लावून प्रयागराज येथे शालकाकडे गेले होते. बंद घर असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप व कोयंडा तोडून घरातील कपटातून सोन्याचे दागिने व रोकड असा एकुण ७० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. विजय तायडे हे गुरूवारी २९ डिसेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता घरी आले तेव्हा घरात चोरी झाल्याचे उघडकीला आले. घरातील दोन्ही कपाट उघडे आणि घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसून आले. याबाबत रामांनदनगर पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती घेतली. शुक्रवारी ३० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात विजय तायडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content