जामठी येथे विनापरवाना वृक्षतोड; कारवाईची मागणी

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील जामठी शिवारात विनापरवाना वृक्षतोड करण्यात आली. यासंदर्भात मुक्ताईनगर वनविभाग कार्यालयात तक्रार देवून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. वनविभागाचे याकडे दुर्लक्ष केल्याने हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने आमरण उपोषणाला सुरूवात करण्यात आली.

बोदवड तालुक्यातील जामठी येथील सी.एस.महाजन हायस्कूलचे चेअरमन अशोक काशिनाथ सत्रे यांच्या शेत जमीन जामठी शिवारात गट क्रमांक ५१ आहे. त्याठिकाणी असलेल्या वृक्षांची विनापरवाना वृक्षतोड करण्यात आली. अशी तक्रार चेतन तायडे रा. आमदगाव आणि अनिल देवकर रा. बोदवड यांनी २२ डिसेंबर रोजी मुक्ताईनगर वन विगााला दिली. परंतू अद्यापही वनविभागाने दखल न घेतल्यामुळे २९ डिसेंबर रोजी आमरण उपोषणाचे पत्र हिंन्दू एकता आंदोलन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल देवकर व माहीती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे तालुकाध्यक्ष चेतन तायडे यांनी आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे.

दरम्यान जामठी येथील सार्वजनिक बांधकाम विभाग, नाला, व ग्रा.पं. हद्दीच्या क्षेत्रातील वृक्षतोड करण्याबाबत वनविभागाचे वनपाल अधिकारी उमाकांत कोळी यांना हिंदू एकता आंदोलन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल देवकर व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे बोदवड तालुकाध्यक्ष चेतन तायडे यांनी अवैध वृक्ष तोडणे बाबत विचारणा केली असता वनपाल कोळी यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली,त्यावेळी अनिल देवकर व चेतन तायडे यांनी जामठी येथे घटनास्थळी जाऊन सखोल चौकशी केली असता फक्त ९० निंबाची व ९ बेहडाची यांची परवानगी दिलेली होती परंतु त्यास क्षेत्रातील व त्याचा आजु बाजूला गट क्र.५२ जिल्हा परिषद जळगाव व गट क्र.५० व ५३ तसेच आजुबाजुच्या शेतकर्यांची संमधी पत्र न घेता सामाईक बांधावरिल फळझाडे बोर,चिंच, इंग्रजी चिंच व गोधन(बोकर) यांची विनापरवानगी कत्तल करण्यात आली.

तसेच संबंधित संपूर्ण झाडांची पाहणी करून तसेच परवानगी मध्ये दिलेले झाडे सध्या स्थितीतील कत्तल केलेली झाडे यात तफावत आढळून आलेली आहे. तरी आपल्या स्तरावरून तात्काळ चौकशी करून संबंधित वृक्षतोड करणारे श्रीमती चि.स महाजन जामठी हायस्कूलचे चेअरमन अशोक काशिनाथ सत्रे ह.मु रांजणी ता.जामनेर,गट क्र ५१ ची सौदा पावती करून घेणारे काशिनाथ गुलाबचंद तेली संजय कापडे(साॅ.मिल मालक) रा.जामनेर,शेख बुडन शेख फकीरा रा.वाघारी ता.जामनेर यांच्यावर व संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई व गुन्हे दाखल करण्यात आलेली नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. या उपोषणाला माहीती अधिकार कार्यकर्ते अर्जुन आसने यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

Protected Content