मनपातर्फे भाजी बाजार भरविण्याची तयारी : महापौर सोनवणे

जळगाव, प्रतिनिधी । काेराेनाचा प्रसार राेखण्यासाठी साेशल डिस्टंसिंग राखणे गरजेचे आहे. पालिका प्रशासनाने खुल्या मैदानावर भाजी बाजार भरवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार खुल्या जागा निश्चित करण्यात आल्या असल्याची माहिती महापौर भारतीताई सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी नगरसेवक कैलास सोनवणे, सहायक उपयुक्त पवन पाटील, प्रभाग अधिकारी व्ही. ओ. सोनवणी आदी उपस्थित होते.

शहरात विविध भागात सुरक्षित बाजार भरविण्याबाबत महापौर भारतीताई सोनवणे पाहणी केली आहे. यात जीएस ग्राऊंड, रामदास काॅलनीतील मैदान, छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहा समोरील खुली जागा, सत्यवल्यभ मंगल कार्यलया शेजारील खुला भूखंड, मणियार लॉ कॉलेजचे मैदान, पिंप्राळाच्या विठ्ठल मंदिर देवस्थानचे राष्ट्रीय महामार्गावरील खुली जागा, मेहरूण शाळा या ठिकाणी भाजी बाजार भरवण्यात येणार असल्याचे महापौर भारतीताई सोनवणे यांनी माहिती दिली. त्यांनी पुढे सांगितले की, खुल्या जागांवर भरविण्यात येणाऱ्या बाजारात सोशल डिस्टंस पाळण्यात येते की नाही यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणारा आहे.

Protected Content