रावेर येथे बायो मायनिंग प्रकल्पास होणार प्रारंभ

WhatsApp Image 2019 11 21 at 17.53.37

रावेर, प्रतिनिधी | शहराच्या स्वच्छते अंतर्गत गोळा केल्या जाणारी कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खात निर्मिती करण्यासाठी घन कचरा व्यवस्थापना अंतर्गत बायो मायनिंग प्रकल्पास पुढील आठवड्यात सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या नियोजनासाठी नगर पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे व लक्ष्मी सेल्स कार्पोरेशनचे संचलक दिग्विजय बच्छाव यांनी प्रकल्पस्थळी जाऊन पाहणी केली.

शहरात दररोज गोळा होणाऱ्या कचऱ्याचा सर्वत्र मोठा प्रश्न निर्माण झाल्याने यावर प्रभावी उपाय म्हणून घन कचरा व्यवस्थापन उपक्रम राबवून त्यामाध्यमातून कचऱ्याचे विघटन व प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मितीसाठी शासनाने पुढकार घेतला आहे. त्याचच भाग म्हणून येथील नगर पालिकतर्फे राबविण्यात येत असलेल्या घनकचरा व्यवस्थापन अंतर्गतअसलेल्या बायोमायनिंग प्रकल्पास पुढील आठवड्यात सुरुवात होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी दिली. यासाठी मालेगाव येथील लक्ष्मी सेल्स कार्पोरेशन प्रा. ली. या कंपनीला ठेका देण्यात आला आहे. यासाठी शासनाने  ९३ लाख रुपये निधी नगर पालिकेला दिलेला आहे. हा निधी खर्चून  २१,००० क्युबिक मीटर कचऱ्याचे बायो मायनिंग केले जाणार आहे.

पावसामुळे होता अडथळा

नगर पालिकेतर्फे दररोज गोळा झालेला कचरा या प्रकल्प स्थळावर जमा करण्यात आलेला आहे. मात्र सतत पाऊस राहिल्याने या कामात अडथळा निर्माण झाला होता. मात्र, पुढील आठवड्यापासून या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत आहे. यासाठी लागणारी मशिनरी, अवजारे येण्यास सोमवारपासून सुरुवात होणार आहेत. मशिनरीचे सुटे भाग आणून ते प्रकल्पाठिकाणी जोडून मशीन प्रक्रियेसाठी कार्यरत करण्यात येईल. यासठी अत्यावशक असलेला वीज पुरवठ्यासाठी नगर पालिकेतर्फे स्वतंत्र फिडर बसविण्यात आलेले आहे.

अशी असेल प्रक्रिया

नगरपालिकेने टाकलेल्या कचऱ्याचा प्रथम एका ठिकाणी ढीग तयार करण्यात येईल. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने खोदुन सर्व कचरा एकत्र केला जाईल. या कचऱ्यातील लोखंड, काच, दगड गोटे, प्लास्टिक हे मशिनरीच्या सहय्याने प्रथम वेगळे केले जातील. त्यानंतर त्यावर बायोकल्चर औषधाची फवारणी करण्यात येईल. हा कचरा २१ दिवसापर्यंत कुजणार आहे. व त्यानंतर बायोमायनिंग प्रक्रिया मशिनरीच्या सहाय्याने करण्यात येईल. या प्रक्रियेतून खताची निर्मिती होणार असून कंपनीतर्फे त्याची विक्री करण्यात येणार आहे. बायो मायनिंग च्या प्रक्रियेमुळे कचरा टाकण्यात आलेली जागा मोकळी होणार आहे.

Protected Content