वर्डी येथे सह्याद्री फाऊंडेशनतर्फे मास्क व साबणाचे वाटप

चोपडा प्रतिनिधी । सह्याद्री फाऊंडेशनच्या वतीने तालुक्यातील वर्डी गावात प्रा. विकास शिंदे यांच्यातर्फे स्वखर्चाने मास्क व साबणाचे वाटप करण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तालुक्यातील वर्डी गावात सह्याद्री फाऊंडेशनतर्फे प्रा.विकास हिम्मतराव शिंदे यांनी स्वखर्चाने १२०० मास्क व १००० साबणाचे वाटप केले. दरम्यान विकास शिंदे यांनी सह्याद्री फाऊंडेशन या समाजसेवी ग्रुप स्थापनेची घोषणा केली. गावातील ग्रामस्थांना कोरोना विषाणूबाबत जनजागृती करत सर्वांनी अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही बाहेर पडू नये. यावेळी मास्क व साबण वापरण्याबाबत आवाहन केले. यावेळी

कार्यक्रमा यांची होती उपस्थिती
भाजपा चिटणीस राकेश पाटील, हिम्मतराव शिंदे, भारती विकास शिंदे , पो.पा. पद्माकर पाटील, माजी सरपंच नंदलाल पाटील, उपसरपंच बारकु पाटील, प्रा.मच्छीन्द्र साळुंखे, बंटीदादा शिंदे, सचीन डाभे, विनायक शिंदे, दत्तात्रय पाटील, नंदलाल शिंदे, शशिकांत शिंदे, संदीप साळुंखे, महेंद्र पाटील, लहुश नायदे, मिलिंद साळुंखे, राहुल लोखंडे, योगेश शिंदे, शांताराम शिंदे, वसंतराव शिंदे, किशोर शिंदे, भागवत शिंदे, मॉन्टी शिंदे, नितीन शिंदे, मिलिंद साळुंखे, घनश्याम पाटील, नरसिंह चव्हाण, भैय्या नायदे, संजय पाटील, राजू देशमुख, संदीप शिंदे, मार्तंड कोळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content