Home धर्म-समाज पाचोऱ्यात उद्या कॉंग्रेसचा भव्य मेळावा

पाचोऱ्यात उद्या कॉंग्रेसचा भव्य मेळावा

0
50

पाचोरा प्रतिनिधी । आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटन वाढवणे, या उद्देशाने पाचोरा कॉंग्रेसतर्फे उद्या (दि. २९ डिसेंबर) रोजी दुपारी १ वाजता शहरातील भडगाव रोडवरील पाटीलदैवयोग मंगल कार्यालयात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासह विविध सहकारी संस्था होवु घातल्या असुन या निवडणुकीच्या पाश्वभूमीवर आणि नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष प्रदिपराव पवार यांचा सत्कार या निमित्ताने पाचोरा शहर व तालुक्यात पदाधिकाऱ्यासह कार्यकर्ते यांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

या मेळाव्याच्या तयारीसाठी कॉंग्रेस पदाधिकारी यांची नुकतीच बैठक तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली. यात शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अॅड अंबादास गिरी, महीला तालुका अध्यक्षा अॅड मनिषा पवार, जिल्हा सरचिटणीस संगिता नेवे, जिल्हा उपाध्यक्षा कुसुम पाटील, अल्पसंख्यक जिल्हा सचिव इरफान मनियार, अॅड कदीर बागवान, शंकर सोनवणे, शरीफ शेख, प्रदीप चौधरी, कल्पेश येवले, सचिन पाटील, रवी सुरवाडे, संजय सोनार आदी उपस्थित होते.

मेळाव्याचे अध्यक्ष कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदिपराव पवार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण यांनी केले आहे.

 


Protected Content

Play sound