फैजपूर शहरात भुकेल्यांना भोजन पुरविण्यासाठी एकवटले हिंदू मुस्लिम तरुण

फैजपूर, प्रतिनिधी । कोरोना संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेकांची उपासमार होत असल्याने गरीब,निराधारांना अन्न धान्य वाटपासाठी अनेकांनी पुढाकार व भुकेल्यांना भोजन पुरविण्यासाठी हिंदू मुस्लिम तरुण एकवटल्याने फैजपूर शहरातील सामाजिक एकात्मतेचे उदाहरण समोर आले आहे.

फैजपूर शहराला ऐतिहासिक,धार्मिक व सामाजिक एकतेचा वारसा लाभला आहे तसेच या शहरात मोलमजुरी व हातावर पोट भारणाऱ्या ची संख्या लक्षणीय आहे. सध्या कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेकांची उपासमार होत असल्याने या पार्श्वभूमीवर गरीब, निराधार, स्थलांतरीत भुकेल्यांना भोजन पुरविण्यासाठी आश्रय फाउंडेशन या डॉक्टरांच्या सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला व दररोज ६० जणांना सकाळ संध्याकाळ जेवण देण्यास सुरुवात केली. या उदात्त कामात कुणाला किंवा कुठल्या स्वयंसेवी संस्थेला स्वेच्छेने एका दिवसासाठी अन्न दान करायचे असल्यास किंवा अजून नवीन निराधारांची जबाबदारी घ्यायचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार फैजपूर शहरातील कल्पेश खत्री, माजी नगरसेवक शेख जफर, हाफिज अनस, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, रईस मोमीन, जलील हाजी अब्दुल सत्तार, पंकज जयकर, पप्पु जाधव, उमेश वायकोळे, कन्हैय्या चौधरी, निलेश नेमाडे, रवींद्र होले, अनवर खाटीक, फारुख शेख अब्दुल्ला, सलाउद्दीन अजीमुद्दीन,अमीर अन्सारी, जावेद शेख,सुफियान शेख, अजीम शेख मन्ना, मुजमिल शेख, मोहसीन खान उर्फ सागर हे हिंदू मुस्लिम तरुण एकत्र येऊन भुकेल्यांना भोजन पुरविण्याची जबाबदारी पार पाडत आहे. दरम्यान गरीब,निराधार, व दैनंदिन मजुरीवर अवलंबून असलेल्या भुकेल्यांना अन्नधान्य व आवश्यक वस्तू देण्याच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले व शहरातील गरजूंना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू देण्यात येत आहे. यात जमाअत इस्लामी हिंदतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे शंभर किट वाटप केले गेले आहे तर आणखी शंभर किट गरजूंना वाटप केले जाणार आहे. माजी नगरसेवक शेख जफर यांनी स्वखर्चातुन गरजूंना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे शंभर किट वाटप,तसेच तडवी फैजपुरीयन्स ग्रुप तर्फे विधवा महिलांना जीवनावश्यक वस्तूचे ७० किट वाटप व माजी उपनराध्यक्ष हाजी सलीम खाटीक यांनीही स्वखर्चातुन इस्लामपुरा, झोपडपट्टी, तडवी वाडा याठिकाणी गरजू गोरगरीब व विधवा महिला यांना गहू, तांदूळ, सारख वाटप केले या उदात्त कार्याने गरजूंना आधार मिळाला आहे.

Protected Content