मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे ‘घरकुलांसाठी’ आंदोलन

WhatsApp Image 2019 07 25 at 5.28.21 PM

जळगाव, प्रतिनिधी | शासकीय व गावठाण भागात आसोदा व ममुराबाद भागातील भूमिहीन व बेघर कुटुंबानाघरकुलसाठी जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

मागील ६ महिन्यांपासून वारंवार निवेदन देऊनही भूमिहीनांना घरकुल उपलब्ध करून देण्यात येत नसल्याने हे थाळीनाद आंदोलन करण्यात आले. असोदा व ममुराबाद गावातील अनेक गरीब, कष्टकरी शेतमजूर, बेघर, भूमिहीन नागरिक शासकीय व गावठाण जागेवर झोपड्या बांधून राहत आहेत. राज्य शासनाच्या परिपत्रकाद्वारे अतिक्रमण केलेल्या झोपडपट्टीवासियांना भोगवटाधारक म्हणून नोंदणी करावी. त्यांची यादी बनवून गटविकास अधिकाऱ्याकडे पक्की घरकुले बांधून देण्याबाबत पाठवावी. असोदा ग्रामपंचायतीने प्रोसेडींग बुकवर गोकुळ नगर व हौसा नगर यामध्ये राहणाऱ्या नागरिकांची यादी तयार करून ठराव पास केलेला आहे. तरी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ऑनलाईन यादी करून ५०० चौ. फुट जागेचे सर्टिफिकेट देऊन ताबडतोब अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी कॉ. विनोद आढळके, कॉ. प्रकाश चौधरी, वंदना सपकाळे, रंजना कोळी, ताराबाई कोळी, रेखा भिल. आशा भिल, बाजीराव पाटील, वसंत पाटील, लोटन पाटील, विश्वनाथ सुतार, दयाराम पाटील, आनंदा पाटील, मनीषा कोळी, शोभा बिऱ्हाडे, अरुणा माळी, छोटी पाटील, वंदना घुले आदींचा सहभाग होता.

Protected Content