जागृती विद्यालयात शिवाजी महाराज आणि संत रविदास जयंती साजरी

पाचोरा (प्रतिनिधी) महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र आयोजित व येथील जागृती विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती व राष्ट्र संत रविदास महाराज जंयती साजरी करण्यात आली. यावेळी पुलवामा येथील अतिरेकी भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

शहीद जवानांना शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन, माऊली जिल्हाध्यक्ष माळी समाज संघटना व देविदास थोरात यांनी आपल्या शाहीरीतून श्रध्दांजली अर्पण केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडाही त्यांनी सादर केला. यावेळी उपस्थित नायब तहसीलदार अमित भोईटे, उपनगराध्यक्ष शरद पाटे, डॉ.प्रविण माळी, व्यवस्थापक बॅक ऑफ महाराष्ट्र माधव लकडे, अॅड. योगेश जे. पाटील, सचिव विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, आर.एस. वाणी मुख्याध्यापक जागृती विद्यालय, कुंदन खेडकर कामगार कल्याण अधिकारी जळगाव, शाळेचे सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचलन राजीव सांवत यांनी केले तर आभार बबन वाघ केंद्र प्रमुख पाचोरा यांनी मानले.

Add Comment

Protected Content