Home Cities चोपडा अडावदमध्ये स्वर्ग रथाचे लोकार्पण; विविध कार्यकारी सोसायटीच्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत

अडावदमध्ये स्वर्ग रथाचे लोकार्पण; विविध कार्यकारी सोसायटीच्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत


चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अडावद येथे गावाच्या सामाजिक गरजांचा विचार करून विविध कार्यकारी सोसायटीतर्फे सुरू करण्यात आलेल्या स्वर्ग रथ उपक्रमाचे रविवारी मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले. गावातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले. सामाजिक बांधिलकी जपत ग्रामविकासासाठी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

अडावद येथील श्रीराम मंदिरासमोरील उनपदेव रस्त्यावर सकाळी दहा वाजता स्वर्ग रथ लोकार्पण कार्यक्रम पार पडला. विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन शोभाबाई संजय पाटील यांच्या हस्ते स्वर्ग रथाचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले. गावातील अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

गावातील नागरिकांना अंत्यविधीच्या प्रसंगी आवश्यक सुविधा सुलभरीत्या उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने विविध कार्यकारी सोसायटीने हा उपक्रम हाती घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले. ग्रामीण भागात अशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेकदा नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही गरज लक्षात घेऊन स्वर्ग रथ उपलब्ध करून देण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमाला सरपंच बाबनखा तडवी, व्हॉईस चेअरमन वैजयंताबाई विक्रम महाजन, पीक संरक्षण सोसायटीचे चेअरमन गुलाब महाजन, माजी सरपंच रतीलाल राजकुळे, साखरलाल महाजन, चोसाका संचालक दिनकर देशमुख, माजी संचालक मनोज देशमुख, अनिल देशमुख, मंगला गुलाबराव पाटील, अश्विनी रवींद्र पाटील, सरलाबाई नगराज पाटील, माजी चेअरमन रमेशचंद्र काबरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच सचिन महाजन, प्रभाकर महाजन, मधुकर कासार, वासुदेव महाजन, रवींद्र पाटील, प्रकाश महाजन, भूषण देशमुख, संजय महाजन, संजय देशमुख, आबा महाजन, प्रमोद देशमुख, रवींद्र महाजन, हरीश पाटील, राजेश देशमुख, सुरेश उगले, पी. डी. मगरे, शकिलोद्दीन शेख, ग्रामपंचायत सदस्य संदीप महाजन, रियाजअली सैय्यद, विठ्ठलराव साळुंखे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound