कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

vidyapith

जळगाव प्रतिनिधी । माजी विद्यार्थ्यांनी संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, रोजगाराच्या संधी, प्रशिक्षण या सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत, असे मत विद्यापीठाच्या लाईफ सायन्सेस प्रशाळेचे माजी संचालक प्रा.डॉ.व्ही.एल.माहेश्वरी यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेतील १९९२-९४ मधील बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा रौप्यमहोत्सवी मेळाव्यात व्यक्त केले.

विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात शनिवारी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ.व्ही.एल.माहेश्वरी बोलत होते. त्यांनी सांगीतले की, माजी विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा प्रशाळेला करुन दिला पाहिजे. यावेळी डॉ.एस.टी.इंगळे, डॉ.सिमा जोशी, प्रा.राजेंद्र देशमुख, डॉ. सुभाष सोनवणे, डॉ.सुरेश टेकी, डॉ. अनिल डोंगरे, प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संजय पवार मंचावर उपस्थित होते. प्रा.डॉ.सिमा जोशी यांनी गतकाळातील आठवणींना उजाळा देत अध्यापनातील आपले अनुभव कथन केले. डॉ.सुरेश टेकी यांनी कठोर परिश्रम, शिस्तबध्दता आणि सातत्य हे तीन गुण जीवनात यशस्वीतेसाठी आवश्यक असल्याचे सांगितले. प्रा.राजेंद्र देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी अपयशाला घाबरुन न जाता लढाऊवृत्ती बाळगावी आणि माजी विद्यार्थ्यांचा आदर्श सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी घ्यावा असे सांगितले. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संजय पवार यांनी माजी विद्यार्थी संघटनेची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन केले. जळगाव जिल्हा दुध उत्पादक संघाचे माजी कार्यकारी संचालक सुभाष सोनवणे यांनी जे पुढे येणार आहे ते यशस्वीरित्या पूर्ण करा असे सांगितले. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी विद्यार्थी दिलीप बॅनर्जी, ढाका, बांग्लादेश, शौरीन शाह, अमेरिका आणि विवेक पाठक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी प्रशांत शर्मा यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करुन देत आपल्या स्वागतपर भाषणात त्यांनी गत आठवणींना उजाळा देत सांगीतले की, आज तुम्ही विद्यापीठाच्या या नयनरम्य वातावरणात शिक्षण घेत आहात. आमच्या वेळी विद्यापीठ शासकीय आयटीआय मध्ये होते. आमचे वर्ग भोईटे शाळेत व्हायचे. प्रथम कुलगुरु डॉ. ठाकरे आम्ही ग्रंथालयात अभ्यास करत असतांना गुपचुप येऊन आम्ही काय वाचतो आहे हे बघायचे. सुट्यांच्या दिवसी सुध्दा विद्यापीठाचे कामकाज सुरु असायचे आणि म्हणून आताचे विद्यार्थी ह्या सुविधांचा फायदा घेऊ शकत आहेत. हा मेळावा आम्ही कुठल्या तरी हॉटेल मध्ये घेऊ शकत होतो मात्र आजच्या विद्यार्थ्यांसाठी हा मेळावा आयोजन करण्याचा उद्देश हाच आहे की, तुम्हाला यातून काही तरी शिकायला मिळावे. दुपारच्या सत्रात माजी विद्यार्थी व प्रशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खुली चर्चा झाली. प्रशाळेचे संचालक प्रा.अनिल डोंगरे यांनी मार्गदर्शन केले.

या मेळाव्यास उत्तरा ग्रुफ ऑफ कंपनीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी, दिलीप बॅर्नजी, बंगाल, दिवाकर पाटील,पुणे, जयवंत धर्माधिकारी,जळगाव, महेश सोनवणे,नाशिक, मनिष पाटील,पुणे, मनोज पाटील,नाशिक, नरेश पाटील,पुणे, परिमलसिंग राजपूत,नाशिक, प्रशांत शर्मा, प्रशांत येवले,एरंडोल, पुरुषोत्तम न्याती, जळगाव, राजशेखर कोल्हे,पुणे, राकेश सोनी,खारघर, रमाकांत कटीयार,दिल्ली, सचिन बापट,नाशिक, संजय महाजन,जळगाव, शौरिन शाह,युएसए, सुदेश फिरके,नाशिक, सुनील श्रीवास्तव,दिल्ली, उमाकांत पावसे,पुणे, विक्रमसिंग घोरपडे,देवास, विवेक पाठक, करजोत, योगेश चांडक,नाशिक, हितेंद्र शिंदे,नाशिक आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत शर्मा यांनी केले. तर आभार उमाकांत पावसे यांनी आभार मानले.

Protected Content