असोदा सार्वजनिक विद्यालयात सावित्रीआई फुलेंची जयंती साजरी

e6ac60f3 84f0 4b6a a783 f1745e92f799

जळगाव (प्रतिनिधी) शिक्षण आणि त्याग, समर्पणाची भावना, हा विचार महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या कार्यातून नव्या भारताला प्रेरणा देणारा आहे. सावित्रीमाईनी स्त्रियांना आत्मभान दिले त्या आत्मभानाची जाणिव तमाम स्त्रियांना असली पाहिजे, असे विचार धनश्री शिंपी हिने सवित्रीमाईची प्रतिकृती साकारत असोदा सार्वजनिक विद्यालयात विद्यार्थाना संबोधित करतांना व्यक्त केले.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीस सवित्रीमाईंच्या प्रतिमेस संस्थाध्यक्ष विलासराव चौधरी, पर्यवेक्षक डॉ मिलिंद बागूल यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी इयत्ता पाचवीची विद्यार्थीनी धनश्री शिंपी हीने सावित्रीमाई फुले तर हेमांगी पाटील हीने जोतीराव फुले यांची भूमिका पार पाडली.सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित नाटक या विद्यार्थ्यांनी सादर केले. चैताली वानखेडे हिने ‘कसं सांगू तुले’ ही कविता सादर केली. सादीया पिंजारी, दीक्षा चौधरी, गायत्री सपकाळे, राजश्री पाटील, साक्षी पाटील यांनी सवित्रीमाईंच्या ओव्या म्हटल्या. आदिती कोल्हे, तृप्ती बिऱ्हाडे, प्रतीक्षा वाघ, उज्वला कोळी या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.मंगला नारखेडे यांनी सावित्रीमाई विषयी माहिती दिली तर उषा नेमाडे यांनी ‘ जर तू नसती सावित्री माते’ हे गीत सादर केले. गोपाळ महाजन सर यांनी बालिका दिन तसेच सवित्रीमाईंच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. पर्यवेक्षक डॉ मिलिंद बागुल यांनी सवित्रीमाईंच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिताली भारुळे हर्षदा सपकाळे या विद्यार्थिनींनी केले तर आभार अदिती कोल्हे हिने मानले. कार्यक्रमप्रसंगी सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री विलास चौधरी यांनी उपस्थिती लाभली. शुभांगीनी महाजन, डी. जी. महाजन व इतर सर्व शिक्षकांची उपस्थिती होती.

Protected Content