भुसावळात अनुश्री बहुउद्देशीय संस्थातर्फे सावित्रीमाईंना अभिवादन

Bhusawal news 1

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ येथील आंबेडकर नगरातील जेतवन बुध्दविहारात अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्थातर्फे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमीत्त महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.

प्रमुख म्हणून जयश्री पाटील, सारीका डफरे, शुभश्री दप्तरे या होत्या. प्रथम सावीत्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. बचत गटातील महिलांना शुभश्नी दप्तरे यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांनी कशा पद्धतीने पुरुषांचा व सगळयांचा विरोध पत्कारुण माहिलांना शिक्षणासाठी प्रवृत्त केले. आज आपण जे इथे आहेत हे सावीत्रीबाई फुले यांच्यामुळे आहोत. यावेळी अध्यक्ष जयश्री इंगळे, उपाध्यक्ष शिला लहाने, डॉ.वंदना वाघचौरे, नगरसेवीका लक्ष्मी मकासरे, सरीता मकासरे, शारदा ठाकूर, अर्चना आहिरे, मंगला महाले, रेखा महाले, सुवर्णा इंगळे, नंदा इंगळे, रंजना दांडगे, अनिता रंधे, सुनंदा तायडे, मीरा सोनवणे, अनिता खुमकर, उर्मिला पगारे आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार जयश्री इंगळे यांनी मानले.

Protected Content