जळगावात परमवीरचक्र शहिद अब्दुल हमीद वेलफेअर फाऊंडेशनतर्फे रक्तदान शिबीर

midc

जळगाव प्रतिनिधी – परमवीर चक्र शहिद अब्दुल हमीद वेलफेअर फाऊंडेशन व रेड प्लस बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी एमआयडीसी पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांनी उपस्थिती दिली.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि परमविर चक्र अब्दुल हमिद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी महापौर करीम सलार, मुकुंद सपकाळे, पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांची उपस्थिती होती.

भाएस मिशनचे प्रदेशाध्यक्ष अमजद पठाण, हरिशचंद्र सोनवणे, मनोहर सोनवणे, मनोज सोनवणे, ज्ञानेश्वर कोळी, अमजद पठाण, जाकीर बागवान, मोहसीन पिजारी, फिरोज पिंजारी, भाएस मिशनचे जिल्हाध्यक्ष जमिल उस्मान शेख यांचयासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कासमवाडी , कब्रस्थान परिसर येथे हिंदू , मुस्लीम समाज बांधव यांनी रक्तदान शिबीरात सहभाग घेऊन ६५ रक्तदातांनी रक्तदान केले. परविर चक्र शहिद अब्दुल हमीद वेलफेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष रफिक मुसा पटेल, उपाअघ्यक्ष फारुक तेली, सचिव मोहसीन मणियार, सहसचिव साजिद मणियार, सदस्य शफिक पटेल, इक्बाल पिजारी, तुषार जाधव, राहुल चौधरी, कुष्णा ठाकूर इतर कार्यकते उपस्थित होते,

Protected Content