पारोळा येथे कॅप्टन हिंमत पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात

jamner News 1

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील देवगाव येथील कॅप्टन हिंमतराव राजाराम निकम हे भारतीय सेना दलातून ३० वर्षाच्या देशसेवेतून निवृत्त झाले. पारोळा बस स्टॅन्डवरून त्यांची पारोळ्या शहरातून जंगी मिरवणूक काढण्यात आली व पारोळ्यातील सर्वच नागरिकांनी त्यांचे स्वागत व सत्कार केले व यानिमित्त त्यांचा सेवापूर्ती सोहळा येथील डी.बी.सोनारनगरमध्ये आयोजित करण्यात आला होता.

अध्यक्षस्थानी माजी आमदार सतीश पाटील व आमदार चिमणराव पाटील होते. यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर ग.स.सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील, जि.प.सदस्य डॉ.हर्षल माने, प्राचार्य बागुल, माजी सभापती मनोराज पाटील, डॉ.शांताराम पाटील, भय्यासाहेब पवार, कृउबा संचालक चतुर पाटील, बाळू पाटील, दिगंबर पाटील, मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे, नायब तहसीलदार पंकज पाटील, गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे, पारोळा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक बागुल, नगरसेवक पी.जी.पाटील, माजी सभापती सुभाष पाटील, सुखदेव पाटील, माजी पो.पा. नारायण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कॅप्टन पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. मान्यवरांची शुभेच्छापर भाषणे झाली. सूत्रसंचालन पाटील यांनी केले. आभार सुनील पाटील यांनी मानले.

Protected Content