कोरोना : राज ठाकरेंनी दिला उद्धव ठाकरेंना महत्वपूर्ण सल्ला !

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या आजारातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या आश्वासक आहे. कल्याणमधील ६ महिन्यांच्या मुलीसह हजारो जण करोनामुक्त झाले आहेत. मात्र, ह्या आकडेवारीला सरकारी व इतर माध्यमांच्या पातळीवर पुरेशी प्रसिद्धी मिळताना दिसत नाही. ती मिळाली तर नागरिकांचा आपल्या डॉक्टरांवरचा, आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा विश्वास अधिक वाढेल आणि सातत्याने भीतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या नागरिकांना देखील काहीसा दिलासा मिळेल, असा महत्वपूर्ण सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

 

राज ठाकरे हे सध्या सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्कात असून सरकारला काही सूचना करत आहेत. राज यांनी बुधवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी बोलून काही गोष्टी निदर्शनास आणल्या. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राज्यातील करोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. वाढती रुग्ण संख्या कमी करून ही चिंता कमी करण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू आहेत. वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यातील करोनाच्या स्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा सगळ्यांवर लक्ष ठेवून आहेत. मनसेचे कार्यकर्तेही विविध माध्यमातून मदत करत आहेत. राज ठाकरेही सोशल मीडियातून जनतेशी संवाद साधत आहे. राज यांनी एक निवेदन जारी केलं आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह प्रसार माध्यमं आणि लोकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. लोकांच्या मनातील करोनाची भीती दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना काही सूचना केल्या आहेत.

Protected Content