हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान व प्लाझ्मा नोंदणी शिबीर

जळगाव प्रतिनिधी । मेवाडनरेश, हिंदुक्रांतिसूर्य महाराणा प्रतापसिंह यांची 481 जयंतिनिमित्त आज जळगाव येथे भव्य रक्तदान व प्लाझ्मा नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन अखिल भारतीय क्षत्रिय महासभा व सर्व समाजबांधव जळगाव यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले. 

यावेळी जळगाव स्थित महाराणा प्रतापसिंह यांच्या पूर्णाकृती  पुतळ्याला ना. पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्रीताई महाजन, आमदार राजुमामा भोळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, मंत्री गुलाबराव देवकर, जळगाव पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे, ऍड सूचिता हाडा , दिपमाला काळे यांनी पूजन करून पुष्पमाळा अर्पण केल्या. माजी मंत्री एकनाथजी खडसे, आमदार किशोर अप्पा पाटील, डॉ. जी. एन पाटील बापूसाहेब, डॉ. सुरेशसिंह सूर्यवंशी यांनी व्हिडिओ कॉल द्वारे शुभेच्छा दिल्या. 

यावेळी मा.गुलाबराव पाटील यांना महाराणा प्रताप स्मारक समोरील उड्डाणपुलाला महाराणा प्रतापसिंह यांचे नामकरण करण्यात यावे हे निवेदन देण्यात आले. हे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी सूचना ना.मा. गुलाबराव पाटील यांनी महापौर यांना दिल्या. आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात कोरोना संसर्गाला अनुसरून 8 प्लाझ्मा डोंनर यांनी नोंदणी केली असून  72 रक्तदात्यांनी रक्तदान केले या मध्ये दोन महिलांचा समावेश होता. 

तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा प्रदेश अध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष जिवांसिंह बैस, जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर राजपूत, जिल्हा युवा अध्यक्ष दीपक राजपुत, शहराध्यक्ष किरण राजपुत, शहर युवा अध्यक्ष रोशन राजपुत, सोनू राजपुत, राहुल टोके, राज राजपुत, दर्शन राजपुत, मयुर राजपुत यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाला अतुलसिंह हाडा व उदयसिंह पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यावेळे प्रविनसिंग पाटील ,विठ्ठलसिंग मोरे, दामू राजपूत ,दिपकसिंग राजपुत,ऍड स्वप्नील पाटील, मोरे साहेब, विनोद शिंदे, मंगलसिंग राजपुत, ऍड प्रवीणसिंह पूर्भे, मुकेश सिंह बैस, धनंजय राजपूत आदी उपस्थित होते.

 

Protected Content