जळगावात ‘खुशी का पासवर्ड’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी । आपल्या मधूर आणि प्रेरकवाणीने जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील विविध समस्यांवर मार्गदर्शन करुन अनेकांना सकारात्मक जीवन जगण्याची दिशा देणा­या जगप्रसिद्ध मोटिवेशनल स्पिकर ब्रह्माकुमारी शिवानीदीदी यांचे जळगाव येथे ‘खुशी का पासवर्ड’ या विषयावर व्याख्यान 8 मार्च रोजी होणार आहे.

प्रेरक व्यक्तित्व शिवानी दीदी

जळगाव ढाके कॉलनी येथील ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत ब्रह्माकुमारीज् माध्यम प्रतिनिधी डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी कार्यक्रमाची माहिती देतांना सांगितले की, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या ब्रह्माकुमारी शिवानीदीदी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जनसामान्यांना जीवन जगतांना येणा­या अडचणी, छोट्या छोट्या गोष्टीतून नकारात्कता कशी वाढीस लागते व त्यावर काय उपाय करता येईल अशा जनसामान्यांच्या प्रश्नांना प्रभावशाली व अनुभवयुक्त मार्गदर्शन केले आहे. दीदींच्या सहज व चटकन आत्मसात करणा­या उपायांनी अनेकांच्या जीवनाची दशा आणि दिशा बदलेली आहे. त्यांना नुकताच भारताच्या राष्ट्रपतीं महोदयांनी नारिशक्ति या पुरस्काराने सन्मानीत केले आहे. अशा प्रेरक व्यक्तिमत्वाच्या व्याख्यानाचा लाभ जिल्हावासीयांना आणि परिसरातील नागरिकांना  मिळणार आहे. 

जळगाव येथे ऐतिहासिक व्याख्यान

ब्रह्माकुमारीज् जळगाव आयोजित विश्वविख्यात मोटिवेशनल स्पिकर ब्रह्माकुमारी शिवानी दीदींचे प्रेरणादायी व्याख्यान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, स्टेडियम येथे रवीवार दि. 8 मार्च, 2020 रोजी संध्याकाळी 5.30  वाजता ‘खुशी का पासवर्ड’ या विषयावर आयोजित केले आहे.  जास्तीत जास्त नागरिकांना दीदींच्या कार्यक्रमाचा लाभ मिळावा यासाठी ब्रह्माकुमारीज् परिवारातील सर्व सदस्य कामाला लागले आहेत. विविध समित्यांचे गठण याप्रसगी करण्यात आलेले असून शहरात विविध ठिकाणी  बॅनर, होर्डिंग लावण्यात आलेले असून आणि हॅडबीलचे वितरण ही करण्यात येत आहे.  

उपस्थितीचे आवाहन
ब्रह्माकुमारीज् जळगाव उपक्षेत्रीय संचालिका मिनाक्षीदीदी यांनी याप्रसंगी सांगितले की, जळगाव येथे प्रथमच आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त शिवानी दीदींचे व्याख्यान होत असून हे आंम्हा शहरवासीयांचे भाग्य आहे. दीदींचे व्याख्यानास सर्वांना विनामूल्य व खुला प्रवेश असून दिदींच्या व्याख्यानाची लोकप्रियता लक्षात घेता आसन व्यवस्थेच्या निश्चितीसाठी ब्रह्माकुमारीज्च्या सेवाकेंद्रात अथवा ब्रह्माकुमारीज प्रतिनिधींशी संपर्क साधावा.

Protected Content