चोरटा ७ मोटारसायकलींसह ताब्यात

 

रावेर, प्रतिनिधी। केऱ्हाळा बुद्रुक येथील अमर जगन्नाथ पाटील यांची मोटारसायकल १० फेब्रुवारीला रात्री त्यांच्या राहत्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याबाबत त्यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत मोटारसायकल चोरट्यांची माहिती घेतली असता पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना लालमाती येथील अरमान अजित तडवी याने मोटारसायकल चोरली असल्याची गुप्त माहिती मिळाली. अरमान तडवी यास ताब्यात घेतले असता त्याने आतापर्यंत ७ मोटार सायकल चोरल्याची कबुली देत या सर्व मोटारसायकल पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

अमर पाटील यांची १२ हजार रु. किंमतीची बजाज कंपनीची बॉक्सर मॉडेल असलेली मोटारसायकल क्रमांक एमएच१९ एबी ९९४६ हि घरासमोरून चोरून नेली होती. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निलेश चौधरी करीत असतांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. राजेंद्र राठोड, पो. ना. निलेश चौधरी, पो. कॉ. संदीप धनगर, पो. कॉ. नरेंद्र बाविस्कर पो. कॉ. मंदार पाटील ह्यांच्या तपास पथकाने संशयावरून आरोपी अरमान अजित तडवी (रा. लालमाती ता. रावेर) यास अटक केली असता आरोपी तडवी याने ७ मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून खालील वर्णनाच्या ७ मोटारसायकल जप्त केल्या आहेत. बजाज बॉक्सर १२ हजार रुपये किमतीची चेचेस नंबर डीएमएफबीकेएच ७८३३७ इंजिन नंबर डीएमएमबीकेएच ९२०५९, टीव्हीएस व्हिक्टर ६० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची चेचेस नंबर एमडी६२५जीएफ१७जे १ इ २२९१० इंजिन नंबर एलएफआयइजे १६१४१०२ , हिरो पॅशन प्रो ६० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची चेचेस नंबर एमबीएलएचए१०एडब्ल्यूडीएचए ५२८५४ इंजिन नंबर एचए१० इएनडीएचए ५१६८२ , बजाज फोर एस १५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची चेचेस नंबर ३१एफ९४ बी ३०३२२ इंजिन नंबर ३१ एम ९४बी२८५८९ , यामाहा २० हजार रुपये किमतीची लाल रंगाची चेचेस नंबर एमइ१५ केएओए १ बी २०१७३४२ इंजिन नंबर एसकेएएओ१७३५१ , बजाज सिटी१०० किमत २५ हजार लाल रंगाची चेचेस नंबर एमडी२०००युझेडझेडएनडब्ल्यूडी२६५६४ इंजिन नंबर डीयूएमबीएन ८२९८६ , हिरो HF DILUX ५० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची चेचेस नंबर एमबीएलएचए ११ एएलएफ ९ आर ३१७२० इंजिन नंबर एचए ११ इजेएफ ९ बी ३९५४० असा एकूण किंमत २ लाख ४२,००० रुपये किमतीच्या मोटर सायकली चोरल्याची कबुली दिल्याने त्या मेमोरंडम पंचनाम्याप्रमाणे काढुन दिल्या असुन रावेर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आल्या आहेत. ज्यांच्या मोटर सायकल चोरी गेलेल्या आहेत त्यांनी रावेर पोलिसांशी संपर्क ओळखून घेऊन जावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content