सुशांतच्या मृत्यूचा भाजपाकडून राजकीय वापर – चौधरी

नवी दिल्ली ।  सुशांतच्या मृत्यूचा भाजपाकडून राजकीय ट्रम्प कार्डसारखा वापर केला जातो आहे असा आरोप काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे.

सुशांतच्या मृत्यूचा भाजपाकडून राजकीय ट्रम्प कार्डसारखा वापर केला जातो आहे असा आरोप काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. एवढंच नाही तर बिहार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे राजकारण केलं जातं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. रिया चक्रवर्तीला जी अटक करण्यात आली आहे त्यामध्ये तिच्यावर वेगळा गुन्हा आहे. तिला कोणत्याही पुराव्यांशिवाय अटक करण्यात आली आहे. बिहारच्या जनतेला फक्त भाजपा न्याय देऊ शकते असं चित्र रंगवण्याचा प्रयत्न या सगळ्या प्रकारातून होतो आहे असंही अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं आहे.

याआधीही बिहार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकारण केलं जातं आहे असा आरोप झाला होता. आता काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी सुशांतच्या मृत्यूचं राजकारण केलं जातं आहे. बिहार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे सगळं भाजपाकडून केलं जातं आहे असं म्हटलं आहे.

Protected Content