आम्ही कंगना सोबत – रामदास आठवले

मुंबई । मुंबईत राहण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. कंगना रणौतवर अन्याय झाला आहे. तिला न्याय मिळवून देणार असं आश्वासन रामदास आठवले यांनी दिलं आहे. आम्ही कंगनाच्या पाठिशी आहोत असंही आठवले यांनी सांगितलं.

मुंबईतील ऑफिस तोडल्याप्रकरणी आणि मुंबईत सुरक्षा दिल्यानंतर आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी आज कंगना राणौतची तिच्या घरी भेट घेतली. कंगना रणौतला आम्ही पाठिंबा दिला आहे. त्यांच्यावर अन्याय झाला आहे ही त्यांचीही भावना आहे. आमचीही हीच भावना आहे. मुंबई ही आरपीआयची आहे, भाजपाची, राष्ट्रवादी काँग्रेसची, काँग्रेसची, शिवसेनेची सगळ्यांची आहे. मुंबईत राहण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. कंगना रणौतवर अन्याय झाला आहे. तिला न्याय मिळवून देणार असं आश्वासन रामदास आठवले यांनी दिलं आहे. कंगनासोबत मी एक तास चर्चा केली. त्यांनी काय काय घडलं ते सगळं सांगितलं. कंगना कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. तो योग्यच आहे आम्ही कंगनाच्या पाठिशी आम्ही आहोत असंही रामदास आठवले यांनी सांगितलं. कंगना रणौतच्या कार्यालयावर सूड भावनेने कारवाई करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला. तसेच पुढे कंगना भाजपा किंवा आरपीआयमध्ये आल्यास तिचे स्वागत करू, असेही आठवलेंनी सांगितले.

 

Protected Content