रावेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नुकतीच आढावा बैठक कृषी उपन्न बाजार समिती आयोजित करण्यात आली होती.

रावेरात राष्ट्रवादीच्या बैठकीत पदाधिकारी तक्रारीचा पाढा वाचत राहीले तर निरीक्षक बघत राहीतले निमित्त होत पक्षाचा आढावा बैठकीच परंतु स्वकीयांच्याच आरोप-प्रत्यारोपांमुळे राष्ट्रवादीची बैठक चांगलीच गाजली विशेष म्हणजे हे सर्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अविनाश आदीक यांच्या समोर घडले त्यांना काही वेळ आपल भाषण देखिल थांबवावे लागले. यामुळे अध्यक्षीय भाषण न होताच बैठक गुंढाळण्यात आली.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची आढावा बैठक कृषी उपन्न बाजार समिती मध्ये माजी आमदार अरुण पाटील यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली बैठकीला निरीक्षक अविनाश आदीक होते.

बैठकीत सेवादल प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पाटील व राजेश वानखेडे यांनी पक्षातील स्वकीयांच्या तक्रारीचा पाढा वाचला.तर तालुक्यातील जबबादार राष्ट्रवादीचे पदाधिकारी तालुका सोडुन मुंबईचेच् दौरे करता स्थानिक पातळीवर आम्हाला त्यांची कोणतीही मदत होत नाही त्यामुळे संघटन वाढवण्यास आम्हाला तालुक्यात प्रचंड त्रास होत असल्याची खदखद राष्ट्रवादी स्थानिक पदाधिका-यांनी केली.

यांची होती उपस्थिती

बैठकिला राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, शहराध्यक्ष महेमुद शेख, महीला तालुकाध्यक्ष रेखा चौधरी, प स सदस्य योगिता वानखेडे, दिपक पाटील तालुका सरचिटणीस मंदार पाटील,राजेश वानखेडे,मायाताई बाऱ्हे, राष्ट्रवादी सरचीटणीस विनोद पाटील, तालुका उपाध्यक्ष तथा सरपंच गणेश महाजन,भागवत चौधरी,घनशाम पाटील,आर डी वाणी,राजेंद्र चौधरी,आदी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पदाधीकारी मोठ्या संखेने महीला व कार्यकर्ते उपस्थित होते.

तालुका व शराध्यक्षकांनी मांडला आढावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकतवर्तीय मानले जाणारे निरिक्षक अविनाश आदीक यांनी रावेरात पक्षाचा आढावा बैठक घेतली यावेळी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी म्हणाले तालुक्यात राष्ट्रवादी दोन नंबरचा पक्ष असून आगामी निवडणूकामध्ये एक नंबर केला जाणार असल्याची हमी त्यांनी दिली तर शहराध्यक्ष महेमुद शेख यांनी आम्हाला स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार द्यावे तर मागील निवणुकीत राष्ट्रवादी पक्षा कडून एकही उमेदवार दिला नव्हता म्हणुन शहरात आपला नगर सेवक नाही परंतु पक्ष वरिष्ठ पातळी वरुन पक्षाने आम्हाला मदत केली तरी स्थिती सुधारली जाणार असलल्याचे शहराध्यक्ष महेमदु शेख यांनी निरिक्षकांना सांगितले.

 

 

Protected Content