बुलढाण्यात अवकाळी पाऊस : शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ 

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | बुलढाणा शहरात रात्रभर विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू आहे. माञ, रब्बी पिक नुकसानीच्या भीतीने शेतकऱ्यांची चिंता वाढली.

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार बुलडाणा जिल्ह्यात कालपासून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या तर बुलडाणा शहर व परिसरातील मोताळा, देऊळघाट, सागवान या गावात रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे.

रात्री अचानक जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली ती सकाळ पर्यन्त कमी – अधिक प्रमाणात सुरू आहे. बुलढाणा शहरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण बुलढाणा शहर जवळपास 6 तास अंधारात होते, तर या पावसाने शेतकऱ्यांचा कांदा , हरभरा, गहू, आदी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, तर जिल्ह्यात इतर ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे.

Protected Content