ब्राम्हण समाजाचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । ब्राह्मण समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्था, ब्राह्मण महाशिखर परिषदेसह विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य स्तरीय ब्राह्मण समाजाच्या नेतृत्वाखाली ज्ञाती सामाजिक संस्था कार्यरत असून सरकारकडे वेळोवेळी होणाऱ्या अन्यायाबद्दल आम्ही खालील मागण्या आपल्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करावे ही विनंती. ब्राह्मण समाज हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्थितीत आहे. पुरोहित वर्गाचे उदरभरण हे हातावर आहे. या पुरोहित वर्गाला शासनामार्फत अनुदान मिळावे. ब्राह्मण समाजाच्या महापुरूषांविषयी सतत अपशब्द काढून समाजाविषयी अपमानकारक वक्तव्य करण्याच्याविरूध्द कडक कायदा पारित करण्यात यावा. सदरील ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्या पुर्ण करण्याकरिता पुन्हा पुन्हा आंदोलन, मोटर सायकल रॅली, धरणे आंदोलन केली आहेत. समाजाच्या आग्रहास्तव जळगाव नगरीत सगळे ब्राह्मण समाजातील संस्थेच्या माध्यमातून उपोषण आज दि.२८ मार्च २०२२ रोजी संपन्न होत आहे.

तरी वरीष्ठ अधिकारी वर्ग राज्य मंत्री मंडळ व मान्यवर अधिकारी वर्ग यांना विनंती अर्ज समाजाच्या वतीने करीत आहोत. प्रथमतः १ सप्टेंबर २०१८ रोजी केज तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले होते. व्दितीय: २८ ऑक्टोबर २०१८ रोजी केज ते बीड मोटर सायकल रॅली मोर्चा तृतीयः २२ जानेवारी २०१९ रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले. चतुर्थ: ३ ऑक्टोबर २०१९ रोजी औरंगाबाद आयुक्तालय व नागपूर येथे आंदोलन करण्यात आले. पंचम: दि. २० जानेवारी २०२० रोजी जालना येथे आंदोलन करण्यात आले. षष्टम: दिनांक २२ जानेवारी २०२० रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सप्तम दिनांक दि. १२ जानेवारी २०२१ रोजी परत एकदा महाधरणे आंदोलन करण्यात आले आहे. खुप नाही ब्राह्मण समाजाच्या अगदी खुपच खुप कमी मागण्या आहे. स्वातंत्र मिळाल्यापासून ७० वर्षांमध्ये पहिल्यांदा काहीतरी ब्राह्मण समाजाने मागणी सरकारकडे केली आहे. सरकारकडे हिच विनंती आहे की ही काही अवाजवी किंवा आगळी वेगळी मागणी केलेली नाही किंवा करणार नाही. तरी दैनंदिन जीवनात रोजच्या घडामोडीत ज्या अडचणी किंवा ज्या अपमानास्पद वागणुकीला सामोरे जाणे झेपत नसून प्रथमतःच ब्राह्मण समाजाला सरकार कडे व वरिष्ठ अधिकान्याकडे विनंती अर्ज स्मरणपत्राव्दारे निवेदन वारंवार करित आहे. तरी त्याकडे लक्ष देऊन आमच्या मागण्या पुर्ण कराव्यात.

ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्याचे निवेदन

ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी; यात ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी; ब्राह्मण समाजावर होणारी जातीय चिखलफेक थांबविण्यासाठी व महापुरुषांची होणारी बदनामी थांबविण्यासाठी कायदा करण्यात यावा; महाराष्ट्र सदन दिल्ली तसेच संसद भवन येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पूर्णाकृती पुतळा स्थापन करण्यात यावा; पुण्यातील शनिवार वाडा येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे शौर्य व युध्दाच्या इतिहासाचे संग्रहालय व पेशवे सृष्टी स्थापन करण्यात सी.बी.एस.सी. स्टेट बोर्ड यांच्या पाठ्यपुस्तकात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा यावी; स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. ब्राह्मण समाजासाठी शेतकऱ्यांना शेतीची अवजारे व ट्रॅक्टर मोफत उपलब्ध करून देण्यात यावे; प्रत्येक जिल्ह्यातील ब्राह्मण समाजातील विद्यार्थाना वसतिगृह बांधून द्यावेत; पुरोहितांना मासिक पाच हजार रूपये मानधन देण्यात यावे; वर्ग २ व्या इनाम जमीनी या वर्ग १ कराव्या विकसीत करण्याचा अधिकार द्यावा; ब्राह्मण समाजाला के जी टु पी जी शिक्षण मोफत द्यावे; श्रीवण येथील पेशवे स्मारकाची देखभाल व डागडुजी करण्यात यावी; भगवान परशुराम मंदिरासाठी विशेष धार्मिक स्थळाचा दर्जा देण्यात यावा, अशा विविध मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content