भडगावात अग्नीतांडव : लाखोंचे नुकसान

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील दोन दुकानांना रात्री लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले असून नगरपालिकेच्या अग्नीशामक दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली.

येथील मेन रोड वरील आकाश मोबाईल व समर्थ लॅब या दोन दुकानांना काल रात्री साडेदहाच्या सुमारास आग लागली. या दोन्ही दुकानांमधून धूर निघतांना पाहून नागरिकांनी याबाबतची माहिती दुकानांचे मालक आणि अग्नीशामत दलास दिली. आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर फायर फायटरच्या पथकाने येथे येऊन आग आटोक्यात आणली.

या आगीमध्ये आकाश मोबाइल या दुकानातील मोबाईल साहित्य, मोबाइल व मशीनसह अन्यवस्तू संपूर्ण जळून खाक झाल्या. तसेच समर्थ लॅबचेही मोठे नुकसान झाले. या दोन्ही दुकान मालकांना या आगीमुळे लाखोंचा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळाली नसली तरी शॉर्ट सर्कीटमुळे हे अग्नीतांडव घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: