अज्ञात वाहनाच्या धडकेत पती ठर; पत्नी गंभीर जखमी

पहूर. ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर येथील राजश्री कोटेक्स जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला असून त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, पहूर येथील जामनेर रोड लगत असलेल्या राज्यश्री कोटेक्स जवळ काल रात्री आठच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकल क्रमांक एम. एच.०५ सी. डी.४०३२ वरील मोटारसायकल स्वार ज्ञानेश्वर पांडुरंग सोनवणे (वय ५०, राहणार शेंदुर्णी लिहा तांडा, ता. जामनेर ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी सरला ज्ञानेश्वर सोनवणे (वय ४५) या गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारार्थ जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच आमदार गिरीश महाजन यांनी तातडीने पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात येऊन मयताच्या नातेवाईकांची चौकशी करून त्यांचे सांत्वन केले. तसेच त्यांनी गंभीर जखमी असलेल्या सरला सोनवणे यांच्यावर तातडीने उपचार करण्याच्या सुचना दिल्या. याबाबत रात्री उशीरापर्यंत पहूर पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरू होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: