महिला दिनानिमित्त नूतन मराठा महाविद्यालयात तीन दिवसीय कार्यशाळा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | – आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नूतन मराठा महाविद्यालय आणि हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने  नूतन मराठा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ७ ते ९ मार्च या कालावधीत तीन दिवसीय ” युवती नेतृत्व कौशल्य कार्यशाळा चे आयोजन करण्यात आले आहे.
७ मार्च रोजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.राजेंद्र देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्ट च्या डॉ निलम अग्रवाल, उपप्राचार्य प्रा आर.बी.देशमुख, संयोजिका डॉ. इंदिरा पाटील यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.  यावेळी डॉ. निलम अग्रवाल यांनी जीवन जगतांना ते हलकं आणि फुलकं, आपल्यातील नेतृत्वगुणाचा विकास करण्याविषयी तसेच ध्यान धारणेतून एकाग्रतेसाठी प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन केले.  डॉ निलम अग्रवाल आणि त्यांची कन्या अपुर्वा अग्रवाल या दोन्ही मायलेकींनी मेंदूचे छोटे छोटे व्यायाम तसेच ताण तणावातून मुक्तता, ध्यानधारणेच्या माध्यमातून स्वतःशी संवाद या संकल्पनेशी जोडत तणावमुक्त होण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.राजेंद्र देशमुख यांनी स्री ही नात्याची वीण घट्ट करणारी जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठी शक्ती म्हणून गौरव करत महिला दिनाचे तसेच महिलांनी महिलांसाठी डॉ.निलम अग्रवाल त्यांची कन्या अपुर्वा अग्रवाल यांनी हाती घेतलेल्या या कार्याचा गौरव केला.

महिला दिन आठ मार्च रोजीच का साजरा करण्यात येतो? याच्यामागील पार्श्र्वभूमी कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ.इंदिरा पाटील यांनी प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन तर मराठी विभागाच्या विभाग प्रमुख प्रा.ललिता हिंगोणेकर यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थीनीं, प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content