आफ्रिकेतील ईटीजी कंपनीत निलेश भोई यांची निवड 

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील पातोंडा येथील रहिवासी बुधा भोई यांचे चिरंजीव निलेश भोई (वय-24) ह्या विद्यार्थ्याची आफ्रिका खंडातील नामांकित ईटीजी (एक्स्पोर्ट ट्रेड ग्रुप) कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड झाली असून वार्षिक सतरा लाख रुपयांचे पॅकेज त्याला देण्यात येणार आहे.

निलेशने जालना येथील विद्यालयात कृषी क्षेत्रांत पदवी केली असून पुणे येथील डॉ.डी. वाय.पाटील महाविद्यालयात येथे एमबीए कृषीच्या पदव्युत्तरचे शिक्षण घेत आहे.ग्लोबल बिझनेस स्कुल अँड रिसर्च सेंटरने त्याला ही संधी प्राप्त करून दिली असून महाविद्यालयात एमबीए कृषी क्षेत्रात फ्रेशर म्हणून आजपर्यंत एवढ्या मोठ्या रकमेचे पॅकेज कुणाला भेटले नसून असे पॅकेज घेणारा तो एकमेव विद्यार्थी ठरला आहे. विद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी पुणे येथील चार व दिल्ली,बेंगलोर येथील प्रत्येकी एक अशा सहा कंपन्या आल्या होत्या. उमेदवार निवडीसाठी प्रथम गटचर्चा,तांत्रिक फेरी नंतर मुख्य एचआर फेऱ्या आयोजित केल्या होत्या.सदर मुलाखतीसाठी एकूण 60 विद्यार्थी हजर होते,त्यापैकी सर्व फेऱ्यामधून उत्तीर्ण होत पुण्यातून एकमेव निलेशची निवड झाली आहे.त्याला त्यापोटी 1750 अमेरिकेन डॉलर इतके वार्षिक मानधन मिळणार असून भारतीय चलनात सतरा लाख रुपये वार्षिक वेतन त्याला मिळणार आहे. त्याची निवड बीटूबी (बिझनेस टू बिझनेस) च्या सेल्स एक्झिक्यूटीव्ह पदी झाली आहे. त्यात तो भाताच्या विविध प्रकारच्या जातीची तो आयात निर्यात करणार आहे. पातोंडयातील तो आफ्रिका देशामध्ये जाणारा पहिला सर्वात कमी वय असलेला व इतके मोठे पॅकेज घेणारा एकमेव तरुण ठरला आहे.त्याच्या ह्या यशाचे व निवडीचे महाविद्यालयातील प्राचार्य,शिक्षकवृंद,मित्रमैत्रिणी  व गावांतील ग्रामस्थांकडून त्याचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Protected Content