वाहन विक्री व्यावसायिकांना शासनाने मदत द्यावी : जिल्हाध्यक्ष हितेश पाटील

 

जळगाव, प्रतिनिधी । लॉक डाऊनमुळे सध्या वाहन विक्री व्यवसायाला ब्रेक लागला असून वाहन खरेदी विक्री व्यवसाय करणाऱ्यांना आता उपसमारीची वेळ आली आहे. याबाबत भारतीय वाहन विक्री संघटनेच्या जळगाव शाखेतर्फे शासनाने वाहन खरेदी विक्रेत्या एजटांना मदत करावी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाराष्ट्र कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना इ-मेलद्वारे जिल्हाध्यक्ष हितेश पाटील यांनी केली आहे.

मार्च महिना हा वाहन खरेदी विक्री या व्यवसायाचा तेजीचा काळ असतो. परंतु, याच काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या व्यवसायाची तीन-तेरा वाजले आहेत. वाहन खरेदी विक्री बंद असल्याने शासनाने वाहन विक्रेत्या एजटांना मदत करावी अशी मागणी भारतीय वाहन संघटनेने केली आहे.  लॉक डाऊनमुळे वाहन खरेदी विक्री करणारे एजंट यांचा संपूर्ण व्यवहार ठप्प झाला आहे. मात्र, रोजचा खर्च लॉक डाऊन दरम्यान ऑफिस कर्मचाऱ्यांचे पगार, विज बिल, जीएसटी भरणा, बँक व्याज, शॉप रेंट सह इतर सर्व कर भरणा करावा लागत आहे. वाहन विक्रत्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.  दरम्यान, भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना यांनी महाराष्ट्र शासनाला दिलेल्या निवेदनाची दखल घेतली असून लवकरच निवेदन मान्य करण्यात येईल ई-मेलद्वारे उत्तर आले असल्याची माहिती भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना जळगाव जिल्हाध्यक्ष हितेश पाटील यांना कळविली आहे.

Protected Content