सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे प्रकाशगडासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सातारा येथील असबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन दि. 20 आणि 21 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या 5 व्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराविरोधात संताप व्यक्त केला. या सर्व अन्यायकारक आणि जाचक गोष्टींच्या निषेधार्थ 29 ऑगस्ट 2022 रोजी मुंबईतील प्रकाशगडासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

मागील अनेक दिवसापासून पदोन्नती पॅनलला दिरंगाई करणे, पद्दोन्नती पॅनल घेतले तरी उशिरात उशिरा ऑर्डर काढणं, पदोन्नती अभियंता ना पदस्थापना देताना महावितरणचे परिपत्रक न. ५१४ च सात्यताने होणारे उल्लंघन, अभियंत्यांवर सतत वसुलीसाठी दबाव टाकत रहाणे, शनिवारी रविवार किंवा सार्वजनिक सुट्टी दिवशी कामावर बोलावणे, सतत होणाऱ्या बैठकांमधुन अभियंत्यांना अर्वाच्य भाषेत धमकावणे इत्यादी व यासारख्या असंख्य कारणांमुळे अभियंतांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता. त्याचबरोबर मानव संसाधन विभागामध्ये सुध्दा विविध स्तरावरच्या प्रकरणे वर्षांनुवर्षे प्रलंबित ठेवणे, साध्या कारणांसाठी अभियंत्यांना पद्दोन्नती नाकारणे, शिक्षा देणे, वार्षिक वेतनवाढ रोखणे, महसूल गोळा करण्याची जबाबदारी फक्त अभियंत्यावर लादणे, इत्यादी प्रकारे या ना त्या मागनि, दिवस-रात्र कंपनीसाठी काम करणाऱ्या व कंपनीच्या महसुलात आणि वैभवात कोरोनाच्या कालावधीत सुध्दा जीवाची पर्वा न करता ऐतिहासिक वाढ करणा-या अभियंतांमध्ये महावितरण कंपनीच्या बाबतीत प्रचंड असंतोष पसरला आहे. नुकत्याच झालेल्या कनिष्ठ अभियंता ते सहाय्यक अभियंता पदोन्नती पॅनलच्या अनुषंगाने पद्दोन्नत झालेल्या अभियंत्यांना पोस्टिंग देताना महावितरण प्रशासनाने जाणूनबुजून परिपत्रक क्रमांक ५१४ चे उल्लंघन करून, अनेक अभियंत्यांना प्रादेशिक विभागाबाहेर पोस्टिंग देण्यामध्ये प्रशासनाने धन्यता मानली व अभियंत्यांच्या भळभळणा-या जखमेवर चांगलेच मीठ चोळले. या सर्व अन्यायकारक विषयांबाबतीत प्रदीर्घ चर्चा केंद्रीय कार्यकारिणी मध्ये झाली.

या सर्व अन्यायकारक व दडपशाही गोष्टींचा निषेध म्हणून दि. २९ ऑगस्ट२०२२ रोजी मुंबई येथे प्रकाशगडा समोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय सर्वांनुमते घेण्यात आला. या आंदोलनात महाराष्ट्रातील वीज क्षेत्रातील तीनही कंपनीत कार्यरत असणारे संघटनेचे सर्व प्रादेशिक पदाधिकारी, राज्य समन्वयक, सहसचिव व मंडळ कार्यकारिणीचे सदस्य सामील होणार आहेत. त्याच वेळी राज्यातील इतर सभासद काळ्या फिती लावून व जोरदार गेट मिटिंग घेऊन, सदर बाबतीत निषेध नोंदवणार आहेत. एवढे करूनही महावितरण प्रशासनाने आपला कारभार सुधारला नाही तर येणाऱ्या गणपती उत्सवानंतर प्रदीर्घ आंदोलन छेडण्याचा निर्धार संघटनेच्या वतीने संघटनेचे सरचिटणीस संजय ठाकूर यांनी सांगितले. तरी मुंबई प्रकाशगड येथे होणाऱ्या दिवसीय धरणे आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संजय ठाकूर, सरचिटणीस सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन आणि एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Protected Content