अग्निशमन विभागाचे “मॉकड्रील” : आरोग्य यंत्रणेने घेतले आग विझविण्याचे धडे

 

 

जळगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आग लागल्यानंतर करायच्या प्रतिबंधात्मक बाबींचे प्रात्यक्षिक (मॉकड्रील) मंगळवारी दि. २७ एप्रिल रोजी महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे दाखविण्यात आले.  यावेळी डॉक्टर्स, परिचारिका यांनी सक्रिय सहभाग घेत आग विझविण्याचे धडे गिरविले.

 

यावेळी प्रामुख्याने अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद,  उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ. अरुण कसोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता  गावित, डॉ. विलास मालकर, अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, सहाय्यक अधिकारी सुनील मोरे उपस्थित होते.

यावेळी अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, फायरमन अश्वजीत घरडे, नितीन बारी, तेजस जोशी यांनी उपस्थित यंत्रणेला आग प्रतिबंधनाची सविस्तर माहिती दिली. प्रसंगी, आग  कशी लागते, त्याचे प्रकार किती तसेच आग विझविण्याच्या  पद्धती सांगितल्या. आग लागल्यानंतर आग विझविण्याचे उपकरण कसे वापरावे त्याची माहिती दिली. या उपकरणाचा वापर फर्स्ट एड सारखा होतो. आग कुठे लागली हे शोधणे, त्याची माहिती संबंधित यंत्रणेला देणे व  विझविण्याचा प्रयत्न करणे हे प्राथमिक उपाय करता येतात. यावेळी एलपीजी गॅस सिलेंडरला आग लागल्यावर काय करावे त्याबाबत देखील माहिती देत महिला डॉक्टरांकडून अधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिक करून घेतले.

 

यावेळी उपस्थित डॉक्टर, परिचारिका, अधिकारी यांनी प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात आग प्रतिबंधक टिप्स जाणून घेतल्या. विद्युत पॅनल बोर्डला आग लागली तर पाणी मारणे टाळा. झाडू मारल्याने आग विझू शकते. फायर बिग्रेडच्या वाहनाला येण्यासाठी रस्ता मोकळा हवा, त्यासाठी अद्ययावत असलेल्या पार्किंगचे महत्व त्यांनी स्पष्ट केले.

 

डॉ. इम्रान पठाण, डॉ. इम्रान तेली, डॉ. चेतन भंगाळे, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. अलोक यादव, अधिसेविका कविता नेतकर, स्वच्छता निरीक्षक बापू बागलाणे, कर्मचारी ज्ञानेश्वर डहाके, समाजसेवी अधीक्षक संदीप  बागूल, मंगेश बोरसे, अरुण हळदे  यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, विद्यार्थी परिचारिका, अधिकारी, कक्षसेवक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content