रावेर तालुक्यातील गरीब लाभार्थ्यांसाठी २ कोटींचे अनुदान प्राप्त

 

रावेर, प्रतिनिधी  । लॉकडाऊन काळात गरीब लाभार्थांसाठी तहसीलमधून  चांगली बातमी समोर आली आहे. तालुक्यातील १३ हजार ५०० विविध लाभार्थांसाठी २ कोटी ७० लाखाचे अनुदान प्राप्त झाले आहे.

 

सजंय गांधी निराधारचे नायब तहसीलदार जी. एन.शेलकर सर्व अनुदान त्यांच्या खात्यावर्ग करण्यासाठी कालपासुन काम करताय उद्यापर्यंत सर्व याद्या व अनुदान संबधित बँकेत वर्ग केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना व्हायरस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने लॉकडाऊन 0.2 लावले आहे.या  दरम्यान गरीब लाभार्थांना शासनाने अनुदान देणार असल्याचे सांगितले होते. सजंय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना इंदरा गांधी अनुदान, या योजनेच्या लाभार्थांन एप्रिल व मे महिन्याचे प्रत्येकी दोन हजार रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. तर श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थांना मागील आठशे व आताचे दोन हजार असे एकूण २८०० रुपये मिळणार् आहे. यामध्ये गरीब लाभार्थां मधुन समाधान व्यक्त केले जात आहे. यासाठी लिपिक योगेश मोहिते, ऑपरेटर पुरषोत्तम महाजन आदीचे सहकार्य लाभल्याचे शेलकर यांनी सांगितले.

 

Protected Content