धरणगावात ९ फेब्रुवारीपासून ‘जलस्त्रोत पाहणी सर्वेक्षण २०२०’चे आयोजन

images 10

 

धरणगाव, प्रतिनिधी | शहरातील जलदूत फाऊंडेशन ही संस्था जलसंवर्धन व पर्यावरण ह्या क्षेत्रात काम करण्यासाठी स्थापन करण्यात आली असून शहर पाणीदार व हिरवेगार करणे हे ह्या संस्थेचे अंतिम ध्येय आहे. त्यासाठी फाऊंडेशनतर्फे परिसरात येत्या ९ फेब्रुवारीपासून ‘जलस्त्रोत पाहणी’ करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

 

‘जलस्त्रोत पाहणी’ची आवश्यकता व उद्दिष्टे :- शहरालगत कुठलीही नदी नाही, कुठलाही नैसर्गिक जलस्त्रोत नाही. त्यामुळे आपण पाण्यासाठी केवळ बाहेरील जलस्त्रोतांवर अवलंबून आहोत. त्यामुळे जलपुनर्भरण हा एकमेव उपाय आपल्याकडे आहे. पाणी ह्या गंभीर विषयाकडे लक्ष वेधणे व लोक सहभागातून या समस्येवर उपाय शोधणे.

शहरातील जलपातळी वाढावी, यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे. पावसाचे पाणी जमिनीत मुरावे, यासाठी ‘रेन वॉटर हर्वेस्टिंग’सारखे उपाय करण्यासाठी शहरातील लोकांची कितपत तयारी आहे, ते जाणून घेणे. बोअरवेल पुनर्भरण करण्यासाठी किती नागरिक उत्सुक आहेत, हे जाणून घेणे. पाणी हा आगामी काळातील एक गंभीर विषय ठरणार आहे, त्यामुळे त्याविषयी जनजागृती करतानाच त्यावर माहिती आधारित उपाय शोधणे.

हे उद्देश डोळ्यांपुढे ठेवून फाऊंडेशनच्या वतीने जलस्त्रोत पाहणी सर्वेचे आयोजन करण्यात येणार आहे, तरी शहरातील व परिसरातील नागरिकांनी ह्या सर्वे साठी सहकार्य करावे, असे आवाहन जलदूत फाऊंडेशनने केले आहे.

Protected Content