लाखोंचा मुद्देमाल फिर्यादीला परत ; पहूर पोलिसांचे कौतुक

पहूर.ता.जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शिवना तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद येथील व्यापाऱ्याचे चोरलेले सुमारे पंधरा लाखांचे कपडे फिर्यादीला परत केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पहूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की पहूर पोलिस स्टेशन येथे 31 जानेवारी  2022 रोजी फिर्यादी साईनाथ साहेबराव काळे राहणार शिवना तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद हे त्यांचे गाडी आयशर 1110 क्रमांक  एम. एच .21 एक्स. 4789 या गाडीमध्ये जळगाव मार्केट मधून सिल्लोड ,शिवना, जिल्हा. औरंगाबाद या भागातील विविध व्यापाऱ्यांचे कपडे खरेदी करून सिल्लोड येथे जात असताना पहूर ते फर्दापूर  रोडवर नमूद ट्रकचालकास झोप आल्याने त्याने ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवून झोपी गेला असता अज्ञात आरोपी त्यांनी फिर्यादीच्या ट्रकमधील अंदाजे पंधरा लाख रुपयांचा कपड्यांचा मुद्देमाल चोरून नेला.

यावरून पहूर पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 30 /2022 भादवि कलम 379 प्रमाणे दाखल दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करण्यात आला व तपासात आरोपी पटेल एकबाल अन्वर टेलर वय 48 राहणार राजा कॉलनी मेहरूण जळगाव, शेख अरबाज शेख नासिर वय 21 राहणार सुप्रीम कॉलनी जळगाव, मोबीन अहमद पटेल वय 40 राहणार सालार नगर जळगाव हे आरोपी निष्पन्न करून आरोपींनी चोरलेला मुद्देमाल कपडे 15 लाख 57 हजार 924 रुपयाचा हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हा च्या तपासात मुद्देमाल हस्तगत करणेकामी प्रवीण मुंडे पोलीस अधीक्षक जळगाव,  रमेश चोपडे अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव विभाग, माननीय भारत काकडे उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग, पहूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, किरण बगाले पोलीस निरीक्षक जळगाव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गरजे व पहूर पोलिस स्टेशन टीम यांनी सदरची कामगिरी केली.

याबाबत पहूर पोलीस स्टेशन गुरनं 30/2022 भादवी कलम 379 या गुन्ह्यातील जप्त केलेला मुद्देमाल कपडे 14 लाख 57 हजार 924 रुपये चा डॉक्टर बी. जी. शेखर पाटील पोलीस उपमहानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांचे हस्ते आज रोजी फिर्यादीत परत करण्यात आलेला आहे. पहूर  पोलिसांच्या या विशेष कामगिरीचे  सर्वत्र कौतुक होत आहे.

Protected Content