स्मशानभूमीत स्वच्छता करा- आर्यन ग्रुपची मागणी

पाचोरा, प्रतिनीधी । येथील स्मशानभूमित घाणीचे साम्राज्य पसरले असून नगरपालिका प्रशासनाने येथे स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी येथील आर्यन युवा फाऊंडेशनने मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

याबाबत वृत्त असे की, सध्या कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. शहरात ग्रामिण रूग्णालयासह डझनभर खाजगी कोविड सेंटरवर रूग्णांना उपचार सुरू असुन पाचोरा शहर व तालुकासह जवळपासच्या तालुका आणि तालुक्याच्या सिमेला लागुन असलेल्या मराठवाड्यातुन असंख्य रूग्ण उपचार घेण्यासाठी येतात. असे असतांना गेल्या चार महिन्यात उपचारा दरम्यान दखावल्यांना शासकिय नियमाप्रमाणे पाचोरा शहरातील एकमेव स्मशान भुमित अंत्यविधी करावा लागत आहे. ही अंत्यविधी करण्याची प्रक्रिया टेंडर द्वारे खाजगी कर्मचार्यांना दिली असली तरी या ठिकाणी स्वच्छता होणे अपेक्षित आहे. या भागात नगरपालिका प्रशासनाच्या स्वच्छता विभागाने वेळिच लक्ष घालणे गरजेचे असुन घाणीच्या साम्राज्याने येणारी दुर्गंधी आणि त्यापाठोपाठ येणारे आजार रोखण्यास प्रशासन सक्षम राहणार नाही.
या अस्वच्छतेबाबत शहरातिल आर्यन युवा फाउंडेशनतर्फे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले. यात स्वच्छतेबाबत विनंती करून प्रत्यक्ष परिस्थीतीची जाणिव करून दिली आहे.

याप्रसंगी आर्यन युवा फाऊंडेशन चे अध्यक्ष आर्यन मोरे, मच्छींद्र जाधव, दिपक सोनवणे, धीरज खेडकर, भूषण पाटील, आनंद शिंदे हे उपस्थित होते. नगरपालिका प्रशासनाने या निवेदनाची दखल घ्यावी अशी अपेक्षा फाऊंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

Protected Content