यावल-सातोद रस्त्यावर कोसळून पडलेल्या झाडामुळे वाहतुकीस अडचण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील यावल ते सातोद मार्गावरील प्रमुख रस्त्यावर वादळात पडलेल्या झाडामुळे वाहनचालकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसुन यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या विषयाकडे गांभींयाने लक्ष देऊन रस्त्यावर पडलेल्या त्या झाडाला बाजुला करावे अशी मागणी असंख्य वाहनधारक आणि परिसरातील ग्रामस्थ मंडळीकडून करण्यात येत आहे.

याबाबतचे वृत्त असे की यावल ते सातोद मार्गावरील रस्त्यावर सुमारे एक ते दिड महीन्यापुर्वी आलेल्या वादळी वाऱ्यासह पाऊसात या रस्त्यावर मोठे झाड कोसळुन पडले आहे. या रस्त्यावर पडलेल्या झाडामुळे वाहनधारकांना वाहतुकीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही ग्रामस्थ मंडळींच्या वतीने या प्रकाराची माहीती यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागास कळविण्यात आल्याचे सांगीतले तरी देखील या गांर्भीय प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष देत नाही हा असा राग ग्रामस्थ व्यक्त करीत आहे. दरम्यान या मार्गाने शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी यांच्या जाण्याची मोठी वर्दळ असते.

या झाडामुळे एखाद्या मोटर वाहनाचा अपघात होऊन जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी यावल सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या ठिकाणावर कोसळुन पडलेल्या झाडाला उचलुन वाहन धारकासाठी मोकळा करावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी व वाहनधारकांच्या वतीने करण्यात येत आहे.

Protected Content