वाळू चोराकडून महसूल पथकाला धक्काबुक्की ; गुन्हा दाखल

भडगाव प्रतिनिधी । येथे वाळू चोरीला मज्जाव घालतांना एका वाळू चोराकडून महसूल पथकाला धक्काबुक्की करून ट्रॅक्टरसह पळ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत वाळू चोरविरुद्ध तहसीलदार सागर ढवळे यांच्या फिर्यादीवरून वाळू चोरी व शासकीय कामात अडथळा निर्माण केलाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. २९ मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास वडगाव सतीचे गावाजवळ तितुर नदीपात्रात अवैधरित्या वाळु उचलली जात आहे अशी गुप्त माहीती तहसीलदार सागर ढवळे यांना मिळाली. गुप्त माहितीनुसार सागर ढवळे हे आपल्या पथकासह तितुर नदीत पात्रात गेले असता त्यांना तितुर नदी पात्रात डीआय ७४४ निळ्या रंगाचे ट्रॅक्टर एक ब्रास वाळू चोरी करताना आढळून आले. यावेळी ट्रक्टर चालकास त्याचे नाव व वाहतुक परवाना बाबत विचारपुस करत वाळु वाहतुकीस मज्जाव करत तहसीलदार यांचे पथकातील वाहन चालक विष्णु तायडे, कर्मचारी चेतन राजपूत ट्रॅक्टर ची चावी काढण्यासाठी पुढे गेले असता ट्रॅक्टर चालकाकडून यांना लाथ मारून दूर हुसकावून लावले तर कर्मचारी संदीप बढे हे ट्रॅक्टर चालकास धरण्यासाठी चढले असता त्यांना सुद्धा धक्काबुक्की करून ढकलून दिले. तुम्ही ट्रॅक्टर अडविले तर तुम्हाला सर्वांना ट्रॅक्टर खाली घेऊन मारून टाकेल. अशी धमकी देऊन सुशीलकुमार पाटील याने रेती भरलेले ट्रॅक्टर पळून घेऊन गेला. 

याबाबत तहसीलदार सागर ढवळे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक सुशील कुमार श्रावण पाटील, रा. वडगाव स्वामींचे ता पाचोरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास गिते करीत आहे.

 

Protected Content