अपंग शेतमजुराची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

 

 यावल  : प्रतिनिधी  ।  तालुक्यातील चितोडा येथील  रहिवाशी एका  अपंग शेतमजुराने  विहिरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली

 

पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार चितोडा  येथील रहिवाशी  युवराज काशीनाथ कोलते ( वय ४० ) हा  दोघ पायांनी अपंग होता त्यास दारू पिण्याचे व्यसन  होते तो  २७ मार्चरोजी सकाळी  यावल येथे दवाखान्यात जातो असे सांगुन घरातून निघून  गेला होता परन्तु तो परत आला नाही त्यामुळे शोधाशोध केल्यानंतर त्याचे वडील काशीनाथ कोलते यांनी २९ मार्चरोजी यावल पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची नोंद केली होती

 

आज सकाळी  यावल शिवारातील देवीदास  पाटील यांच्या शेतातील विहीरीतुन दुर्गंधी येत असल्याने लोकांनी खात्री केल्यावर  युवराज कोलते  याचा मृतदेह विहिरीत आढळून आला   त्याचा  शर्ट हा विहीरीच्या कठड्यावर मिळुन  आला होता  नातेवाईकांना हा शर्ट युवराजचा असल्याची खात्री  झाल्यावर अखेर  नागरीकांच्या मदतीने त्याचा मृतदेह  पाण्याचा उपसा   करून विहिरीबाहेर काढण्यात  आला

 

युवराजचा चुलत भाऊ मनोज पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून  यावल पोलीस स्टेशनमध्ये  अकस्मात  मृत्युची नोंद करण्यात आली  पुढील तपास सुरु  आहे . मयत युवराज कोलते यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलचे  ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉ.  .बी .  बी .  बारेला यांनी केले .

Protected Content