पैश्यांसाठी डोक्यात टाकला लाकडी दांडा; कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील आडगाव येथे पैसे घेण्याच्या कारणावरून तरूणाच्या डोक्यात लाकडी दांडा मारून गंभीर दुखापत केली असून त्याच्या कुटुंबियाला मारहाण केल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी चोपडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, इरफान कासम तडवी (वय-२१) रा. जवाईवाडा अडावद ता चोपडा हा तरूण मजूरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो. गावातील दिपक गोपिचंद कोळी यांच्याशी त्याचे पैश्यांचे देवाण घेवाण झालेलेी आहे. दरम्यान ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास इरफान तडवी हा इंदीरा नगरातून जात असतांना दिपक कोळीशी पैश्यांवरून वाद झाला होता. त्यानंतर संशयित आरोपी दिपक गोपिचंद कोळी, गाविंदा ज्ञानेश्वर कोळी आणि राहूल गोपिचंद कोळी रा. इंदीरा नगर, अडावद ता.चोपडा हे इरफानच्या घरी येवून त्याच्या डोक्यात लाकडी दांडका हाणला. यामुळे तो गंभीर जखमी झाला. तर इरफानच्या कुटुंबातिल महिलांसह इतर सदस्यांना धमकी देवून जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर घराचे भिंत, छप्पर, दरवाजे तोडून नुकसान केले आहे. याप्रकरणी इरफान तडवी यांच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोउनि चंद्रकांत पाटील करीत आहे.

Protected Content