चाळीसगावात जुन्या वादातून तरूणाला बेदम मारहाण; आठ जणांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव प्रतिनिधी । जुन्या वादातून दोघांना लोखंडी फायटरने मारहाण करून गळ्यातील सोन्याची चैन व १५ हजार रूपयांची रोकड हिसकावून नेल्याची घटना शहरातील कन्नड रोडवर घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, राजू पुंडलिक कुमावर (वय-४३) रा. घाट रोड चाळीसगाव हा आपल्या नातेवाईकांसह कार घेवून जेवनाचे पार्सल घेण्यासाठी चाळीसगाव कन्नड रोडवरील रस्त्यावर जुन्या भांडणाच्या कारणावरून कृष्णा गायकवाड, अमोल गायकवाड, अभ्या गोल्हार, भुप्या सोनवणे, सचिन गायकवाड, अमळनेरचा दाऊत देशमुख, राहेन भोसले, संजय गांधी नगरच्या पावट्या आणि इतर जणांनी राजू कुमावत याला बेदम मारहाण केली आणि गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेतली, आणि कारचे मोठे नुकसान केले आहे. याप्रकरणी राजू कुमावर याच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दिपक बिरारी करीत आहे.

Protected Content