गुणवंत अधिकारी पुरस्काराने डांभूर्णी येथील दिव्यांक सोनवणे सन्मानित

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील रहिवासी व शैक्षणिक व सामाजीक क्षेत्रात समाज हिताचे उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी दिव्यांक हिरोजीराव सोनवणे यांना महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचा पहिला गुणवंत अधिकारी, अभियांतांकरिता स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर पुरस्कार २०२३ यांना जाहीर करण्यात आला आहे.

दिव्यांक दादा स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर पुरस्कार २०२३ आपणास जाहीर होणं ही समस्त सोनवणे परिवार डांभुर्णी व स्वयंदीप परिवारासाठी अभिमानाची बाब आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे नॅशनल सेन्टर फॉर परफार्मिग आर्ट , नरिमन पॉइंट मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री ना. देवेन्द्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार्थी दिव्यांक सोनवणे हे आजोबा स्व.अण्णा साहेब भीमराव सोनवणे यांचा प्रशासकीय क्षेत्रातील वारसा यशस्वी पद्धतीने व आपल्या प्रामाणिक प्रयत्नांनी जपत आहात याचा डांभुर्णीकरांना सार्थ अभिमान आहे.

Protected Content