जिल्हाधिकारी कार्यालयातून तरूण शेतकऱ्याची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांत कार्यालया समोरून एका शेतकऱ्याची २५ हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात सोमवारी २४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धैर्यसिंग लोटन पाटील (वय-३७) रा. जवखेडा ता.जि. जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेतीचे काम करून तो आपला उदयनर्रवाह करतो. २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता धैरसिंग पाटील हा त्याच्या वैयक्तिक कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांत कार्यालयासमोर दुचाकी (एमएच १९ डीजे ८९४४) ते आला होता. त्यावेळी त्यांनी दुचाकी पार्किंगला लावलेले होती. काम आटोपून आल्यानंतर त्याला जागेवर दुचाकी दिसून आले नाही. त्यामुळे त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही मिळून न आल्याने अखेर धैर्यसिंग पाटील या तरुणाने सोमवारी २४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दिली आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content