विद्यापीठात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने गुरूवार २७ एप्रिल रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

विद्यापीठाशी सलंग्नित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांचे सर्व प्राचार्य, संचालक, अभ्यास मंडळांचे अध्यक्ष, नोंदणीकृत पदवीधर, अधिसभा सदस्य यांच्यासाठी ही कार्यशाळा होणार असून दिवसभराच्या या कार्यशाळेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या राज्य सुकाणू समितीचे अध्यक्ष तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. नितीन करमळकर, सुकाणू समितीचे सदस्य व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, सेवानिवृत्त प्राचार्य अनिल राव, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्रा. आर. डी. कुलकर्णी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल हे मार्गदर्शन करणार आहेत.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अंमलबजावणीसाठी सुकाणू समितीने श्रेयांक आणि अभ्यासक्रम आराखडा निश्चित केला होता गेल्या आठवड्यात राज्यसरकारने या आराखड्याला मंजूरी दिली असून येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्या दृष्टीकोनातून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आणि परीक्षा या विषयावर दिवसभराच्या या कार्यशाळेत मंथन होणार आहे. विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात ही कार्यशाळा होणार आहे.

Protected Content