तरूणीने राहत्या घरात घेतला टोकाचा निर्णय.. रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा गावात राहणाऱ्या एका २० वर्षीय तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ३० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे. तनुजा बाळू कोळी वय २० रा. कानळदा ता. जळगाव असे मयत झालेल्या तरूणीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कानळदा गावात तनुजा कोळी ही तरूणी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. मंगळवारी ३० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घरात कुणाही नसतांना तिने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर खाली उतरवून तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ गुलाब माळी हे करीत आहे.

Protected Content