रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीचा अपघात; दोन जण गंभीर जखमी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधसी । अमळनेर शहरातील एसबीआय बँकेच्या समोरून जाणाऱ्या रस्त्यावरून जात असतांना रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी २७ एप्रिल रोजी रात्री १० वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी ३० एप्रिल रोजी रात्री ११ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, दिपक अभिमन पाटील रा. खेडी खुर्द ता. अमळनेर हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शनिवारी २७ एप्रिल रोजी रात्री १० वाजता दिपक हा त्याचा मित्र सागर नरेंद्र पाटील रा. होळ ता. शिंदेखेडा जि.धुळे यांच्या सोबत लग्नाचे काम घेतल्याने दोघेजण दुचाकी क्रमांक (एमएच १८ सीसी ६३४९) ने होळ येथे जाण्यासाठी अमळनेर शहरातून जाण्यासाठी निघाले. त्यावेळी दुचाकी सागर पाटील चालवित होता. अमळनेर शहरातील एसबीआय बँकेच्या समोरील रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्यावरील खड्डा अचानक आल्याने दुचाकी खड्ड्यात गेली. या अपघातात दिपक पाटील आणि सागर पाटील हे जखमी झाले. यात दिपकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दोघांना अमळनेर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दिपकचे वडील अभिमन पितांबर पाटील यांनी अमळनेर पोलीसात फिर्याद दिली. त्यानुसार दुचाकी चालविणारा सागर नरेंद्र पाटील याच्या विरोधात मंगळवारी ३० एप्रिल रोजी रात्री ११ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार जयंत सपकाळे हे करीत आहे.

Protected Content