आसोदा येथील विवाहितेवर सासरच्यांकडून छळ; पतीसह सहा जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । एमएसईबीत असल्याचे सांगून लग्न लावून फसवणूक करून नवीन दुकान व घर बांधण्यासाठी माहेरहून दहा लाख रूपयांची मागणी करत विवाहितेच्या छळ केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील माहेर आणि तालुक्यातील आसोदा येथील सासर असलेल्या २० वर्षीय विवाहितेला मुलगा एमएसईबीमध्ये नोकरीचे असल्याचे भासवून भुषण प्रभाकर लिंगायत यांच्याशी १९ मे २०१९ रोजी विवाह झाला. लग्नात मुलीच्या आईवडीलांनी पाच तोळे सोने व संसारोपयोगी वस्तू भेट दिल्या. सुरूवातील काही दिवस चांगले गेले. नंतर मात्र छोट्या छोट्या गोष्टींवरून घरातील मंडळी चुका काढत होत्या. एक महिन्यानंतर पती नोकरीस आहे की याची खात्री केली असता आपली फसवणूक झाल्याचे विवाहितेचे लक्षात आले. पती बारा वर्षांनी मोठे असतांना देखील आईवडीलांनी एमएसईबीत नोकरी असल्याने लग्न लावून दिले होते. त्यानंतर विवाहितेचा छळ सुरू झाला. नवीन दुकान घेण्यासाठी आणि घर बांधण्यासाठी माहेरहून १० लाख रूपये आणावे यासाठी पुन्हा शारिरीक व मानसिक छळ सुरू केला. पैश्यांची पुर्तता न केल्यामुळे गेल्या १ वर्षांपासून घरातून हाकलून दिल्याने तालुक्यातील शिरसोली येथे आईवडीलांकडे राहत आहे. नंतर मार्च २०२० मध्ये नंदोईभाऊ मिलट्रीत असल्याचा दम देवून महिला दक्षता समितीला तक्रार दिली. विवाहितेसह तिच्या आईवडीलांना शिरसोली येथे येवून शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. महिला दक्षता समितीत आली असता पती, दिर यांनी मारहाण केली. छळ असह्य झाल्याने विवाहितेच्या फिर्यादीवरून पती भुषण प्रभाकर लिंगायत, दिर किशोर लिंगायत, सासु कविता प्रभाकर लिंगायत, सासरे प्रभाकर मंगा लिंगायत, मधुकर खंबायत सर्व रा. आसोदा ता. जळगाव, नंदोई भाऊ गजानन बापू खंबायत, ननंद वंदना गजानन खंबायत रा. अडावद ता.चोपडा यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदिवण्यात आला आहे.

Protected Content