पिंप्राळा येथील सालदाराच्या आत्महत्येप्रकरणी शेतमालकावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील पिंप्राळा शेत शिवारातील शेतात सालदार गोविंदा बारी यांनी झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शेतमालक निलेश गोविंदा दुबे रा. पिंप्राळा याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयत सालदाराच्या पत्नीच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पिंप्राळा येथील निलेश गोविंद दुबे हे शेतीचे काम पाहतात. त्यांच्याकडे काही वर्षांपासून गोविंदा श्रावण बारी (४२, रा.बारीवाडा, पिंप्राळा) हे सालदार म्हणून कामाला आहेत. शेतमालक दुबे सालदार बारी यांनी विनाकारण शिवीगाळ करणे, मारहाण करत होते. ११ ऑक्टोबर २०२० रोजी सालदार गोविंदा बारी हे दुध काढण्यासाठी गेले असतांना त्यांच्याकडून दुध सांडल्याने निलेश दुबे याने शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्या दिवशी दुपारी बारी हे बैलजोडी घेऊन ते शेतात गेले. दिवसभर व रात्री घरी परतलेच नाही. उशिराने येतील म्हणून कुटुंबियानेही दिवसभर शोधाशोध केली नाही, मात्र रात्री त्यांचा शोध सुरु झाला. ११ ऑक्टोबर रोजी शेतातील काही मजुरांना गोविंदा बारी यांनी झाडाला दोरी बांधून गळफास घेतल्याचे दिसले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. रामानंदनगर पोलीसांनी जाबजबाब नोंदविल्यानंतर अखेर आज रामानंद नगर पोलीस ठाण्यात शेतमालक निलेश दुबे याच्या विरोधात आत्महत्ये प्रवृत्त केल्याप्रकरणी गोविंदा बारी यांच्या पत्नी प्रतिभा बारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Protected Content