दुचाकीच्या धडकेत पायी जाणारी महिला जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  याप्रकरणी जळगाव शहरातील ख्वॉजामिया चौकातून पायी जात असलेल्या महिलेला दुचाकीने धडक दिल्याने ती जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.मंगळवार, २ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील राधाकृष्ण नगर येथे शुभांगी धर्मा पाटील वय ४५ ह्या वास्तव्यास आहेत. त्या सोमवार, १ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ख्वॉजामिया चौक परिसरातून जात असतांना एम.एच. १९ डी.जे.६९५१ या भरधाव दुचाकीने धडक दिली. या धडकेत शुभांगी पाटील ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत उपचार घेतल्यानंतर जखमी शुभांगी पाटील यांनी दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन एम.एच. १९ डी.जे.६९५१ या क्रमाकांच्या दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वागळे हे करीत आहेत.

Protected Content